प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कर्नाटकात रविवारी दिवसा कर्फ्युचा आदेश देण्यात आला होता. या आदेशानुसार शनिवारी सायंकाळपासून शनिवारी सायंकाळी 7 पासून सोमवारी सकाळी 7 पर्यंत 36 तास कर्फ्यु असायचा. या आदेशात बदल करुन रविवारी 31 मे रोजी दिवसा कर्फ्यु रद्द करण्यात आला आहे.
राज्याचे मुख्य सचिव टी. एम. विजयभास्कर याने या संबंधीचा आदेश दिला आहे. शनिवारी जारी करण्यात आलेल्या नव्या आदेशानुसार रोज सायंकाळी 7 ते दुसऱया दिवशी सकाळी 7 पर्यंतची जमावबंदीचा आदेश असणार आहे. रविवारी पूर्ण दिवस कर्फ्यु रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी सकाळी 7 पासून व्यवहार सुरळीत राहणार आहेत. मात्र सायंकाळी 7 ते दुसऱया दिवशी सकाळी 7 पर्यंत कर्फ्यु असणार आहे.