प्रतिनिधी/ फातोर्डा
कोकणी भाषा मंडळ संचालित रवींद केळेकर ज्ञानमंदिराचा वार्षिक शिष्यवृत्ती वितरण सोहळा नुकताच कोकणी भवनांत आयोजित करण्यात आला. गजानन आणि लक्ष्मीकांत नाडकर्णी यांनी हिराबाई आणि दिनानाथ नाडकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कृत केलेली शिष्यवृत्ती यावषी मनीष पाटील, साहिल मोरजकर, प्रिया लवंदे, प्रमिला रॉय, ऋषभ काळे यांना प्राप्त झाली आहे. शालन नाडकर्णी यांच्या हस्ते शिष्यवृत्ती वितरण झाले.
सोशल डिस्टन्सिंग पाळून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या शालन नाडकर्णी तसेच कोकणी भाषा मंडळाच्या अध्यक्षा अन्वेषा सिंगबाळ, रवींद केळेकर ज्ञानमंदिराच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत नाईक, व्यवस्थापन समितीचे सदस्य चेतन आचार्य, प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. अभिजित नाडकर्णी आणि मुख्याध्यापक अनंत अग्नी उपस्थित होते. सिंगबाळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी बोलताना डॉ. नाडकर्णी यांनी रवींद केळेकर ज्ञानमंदिराच्या शैक्षणिक आणि इतर उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात मागे राहता कामा नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी कोकणी भाषा मंडळाच्या वार्षिक मीरा कोसंबी व्याख्यानमालेत पुण्यातील बाल आणि कुटुंब मानसोपचार सल्लागार डॉ. भूषण शुक्ला यांचे ‘कुतुहल-आजच्या धाडसी युगात कसे, कशासाठी आणि केव्हा’ या विषयावर ऑनलाइन व्याख्यान झाले.