ऑनलाईन टीम / मॉस्को :
रशियात 28 प्रवाशी असलेले विमान बेपत्ता झाले आहे. रशियाच्या कामचत्स्की या दुर्गम भागात या विमानाचा संपर्क तुटला असून, सर्चमोहिम सुरू आहे. रशियाच्या परिवहन मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
बेपत्ता विमान पेट्रोपावलोव्स्क-कामचत्स्की शहरातून पलाना येथे जात होते. विमान लँडिंगच्या जवळपास दहा किमी अंतरावर असताना त्याच्याशी संपर्क तुटला. त्यांनतर तात्काळ रुटवर त्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. या विमानात 22 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते.