ऑनलाईन टीम / किव्ह :
रशिया आणि युक्रेनमध्ये मागील 20 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाची धग आजही तीव्र आहे. रशियाने मारिओपोलमधील सर्वात मोठे रुग्णालय ताब्यात घेतले असून 400 लोकांना ओलीस ठेवल्याचा दावा युक्रेनने केला आहे.
रशिया आणि युक्रेनमधील वादावर अद्याप तोडगा निघालेला नाही. दोन दिवसांपासून या दोन देशात चर्चा सुरू आहे. आजही दोन्ही देशांचे प्रतिनिधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चेत भेटतील. युक्रेनने नरमाईची भूमिका घेतली आहे. मात्र, रशिया युक्रेनच्या शहरांवर सातत्याने बॉम्बफेक करत आहे. त्यामुळे अनेक शहरे उद्धवस्त होत आहेत. या युद्धात आतापर्यंत 1700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. असे असतानाच आज रशियाने मारिओपोलमधील सर्वात मोठे रुग्णालय ताब्यात घेऊन 400 जणांना ओलीस ठेवल्याची माहिती समोर आली आहे.