जपानमध्ये करण्यात आली निर्मिती
जपानमध्ये जगातील पहिले असे वाहन तयार करण्यात आले आहे, जे रस्त्यासोबत रेल्वेमार्गावरही धावू शकते. ही एक बस असून ते रस्ते तसेच रेल्वेमार्गावर सहजपणे धावू शकणार आहे. टोकियो ऑलिम्पिकपर्यंत या बसचे संचालन सुरू होणार असल्याचे पूर्वी सांगण्यात येत होते, पण आता ही बस नाताळानजीक लोकांसाठी धावू लागणार आहे.
बसचे प्रारंभिक परीक्षण यशस्वी ठरल्यावर सरकारने दोन राज्यांदरम्यान त्याची सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे. जगातील हे अशाप्रकारचे पहिलेच वाहन आहे. याचे संचालन जपानची कंपनी एसा सीसाइड रेल्वे करत आहे. प्रारंभी ही बस केइओ, टोकूमिशा, मुरोतो आणि कोचीदरम्यान धावणार आहे. डय़ूअल मोड व्हेईकलचा मार्ग रस्ते आणि रेल्वेमार्गावरून धावता येईल अशाप्रकारचे निश्चित करण्यात आला आहे. या वाहनाची सुरुवात नाताळावेळी शिकोकुपासून केली जाणार आहे.
कशी धावणार बस?
डय़ुअल मोड व्हेईकलच्या मार्गानुसार ते 6 किलोमीटर रस्त्यावर तर 10 किलोमीटरचे अंतर रेल्वेरुळावरून कापणार आहे. जपानी प्रसारमाध्यमानुसार अशाप्रकारचे वाहन तयार करण्यासाठी मायक्रोबसमध्येच काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. या वाहनात अशाप्रकारची चाकं जोडण्यात आली आहेत, जी रेल्वेमार्गावर धावण्यासाठी उपयुक्त आहेत. बस रस्त्यावर धावणार असल्यास ही चाकं वरील बाजूस जातात आणि सामान स्वरुपात बस टायरच्या मदतीने धावू लागते. अशाच प्रकारे गरज भासल्यास त्यांना स्विच केले जाऊ शकते.
दिवसात 13 फेऱया
बसमध्ये एकूण 18 प्रवासी सामावले जाऊ शकतात. ही बस स्वतःला मार्गानुसार स्विच करू शकत असल्याने लोक यातून प्रवास करण्यासाठी उत्सुक आहेत. नाताळापासून याची अधिकृत सुरुवात झाल्यावर दर दिनी ही बस स्वतःच्या मार्गावर 13 फेऱया मारणार आहे. या बसमधून प्रवास करण्यासाठी लोकांना स्वतःचे तिकीट बुक करावे लागणार आहे. हे बुकिंग ऑनलाइन बुक करता येणार आहे. जपानी सोशल मीडियावर याची छायाचित्रे आणि डेमो व्हायरल होतोय आणि लोक याला मोठी पसंती देत आहेत.