जॉन क्लार्क हा अमेरिकेच्या नौदल विभागात कार्यरत आहे. त्याच्या पत्नीची हत्या होते आणि हत्येची पाळेमुळे शोधत असताना एका वेगळय़ाच गुंत्यात तो अडकतो. त्याची कहाणी विदाऊट अ रिमोर्स या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. टॉम क्लॅन्सी लिखीत याच नावाच्या पुस्तकावर हा चित्रपट बेतलेला आहे. या चित्रपटात मायकल जोर्डन, जेमी बेल, जॉडी टर्नर- स्मिथ, ल्युक मिशेल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. स्टीफानो सोलिमा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून टायलर शरिडॅन यांनी पटकथा लिहिली आहे.
संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई