प्रतिनिधी / बेळगाव
बहीण-भावाच्या अतुट बंधनाचा सण म्हणजे रक्षाबंधन. यादिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. आणि भाऊदेखील तिच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असतो. ज्या बहिणींना शुक्रवारी राख्या घेणे शक्मय झाले नाही अशा बहिणींनी आपल्या भाऊरायांसाठी शनिवारी राखी खरेदी केली. विकेंड कर्फ्यूत फक्त अत्यावश्यक सेवेला मुभा होती. त्यामुळे दुकानांचे शटर बंद करून विपेत्यांनी बहिणींना खरेदीसाठी राख्या उपलब्ध करून दिल्या. यावेळी दुकानांच्या बाहेर राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यावेळी बहिणींनी खरेदीसाठी एकच गर्दी केली होती.