भारतातील अनोखे रेल्वेस्थानक
दिल्ली-मुंबई रेल्वेमार्गावर एक रेल्वेस्थानक आहे, जे दोन राज्यांमध्ये विभागले जाते. राजस्थानच्या झालावाड जिल्हय़ात येणाऱया या स्थानकावर निम्मी रेल्वे एका राज्यात उभी असते, तर त्याचे निम्मे डबे दुसऱया राज्यात असतात.
या स्थानकाचे नाव भवानी मंडी रेल्वेस्थानक असून ते राजस्थान आणि मध्यप्रदेशात विभागले गेले आहे. भारतात हे अशाप्रकारचे एकमात्र रेल्वेस्थानक आहे. या अनोख्या रेल्वेस्थानकावर दोन्ही राज्यांच्या संस्कृतीची प्रचिती येते. मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या सीमेवरील हे रेल्वेस्थानक अनेकार्थाने अत्यंत विशेष आहे. या स्थानकावर लोक तिकिट घेण्यासाठी राजस्थानात उभे राहतात आणि तिकीट देणारा क्लार्क मध्यप्रदेशात बसतो.
मध्यप्रदेशच्या लोकांना प्रत्येक छोटय़ा-मोठय़ा कामासाठी भवानी मंडी स्थानकालाच जावे लागते. याचमुळे दोन्ही राज्यांच्या लोकांमध्ये प्रेम आणि सौहार्द दिसून येतो. राजस्थानच्या सीमेवरील स्थित लोकांच्या घरांच्या पुढील दरवाजा भवानी मंडी भागात खुलतो तर मागील दरवाजा मध्यप्रदेशच्या भैसोदा मंडीमध्ये उघडतो.
तस्करीसाठी बदनाम
दोन्ही राज्यांचे सीमावर्ती भाग अमली पदार्थांच्या तस्करीसाठी बदनाम आहेत. मध्यप्रदेशात चोरी करून राजस्थानात पळ काढतात. तर राजस्थानात चोरी करून गुन्हेगार मध्यप्रदेशात पसार होता. याचमुळे दोन्ही राज्यांच्या पोलिसांदरम्यान अनेकदा वादही होतो.
स्थानकाच्या नावावर चित्रपट
या रेल्वेस्थानकाच्या नावावर एक चित्रपटही तयार झाला आहे. या विनोदी चित्रपटाचे नाव भवानी मंडी टेसन असून त्याचे दिग्दर्शन सईद फैजान हुसैन यांनी केले होते. या चित्रपटात जयदीप अल्हावत यासारख्या कलाकारांनी भूमिका साकारली होती.