प्रतिनिधी / वारणानगर
कोडोली ता. पन्हाळा येथील निमंत्रिताच्या खुल्या पुरुष गटातील राज्यस्तरीय स्पर्धेतील अंतिम चुरशीने खेळलेल्या बी. ई. जी. स्पोर्ट्स (आर्मी) पुणे व मुंबई पोलीस यांच्यातील सामना ३४ विरुद्ध ३० अशा गोलने होऊन बीईजी आर्मी पुणे संघाने ४ गुणाने मुंबई पोलीस संघावर चुरशीने मात करीत हा सामना जिंकत या स्पर्धेतील अजिक्यपद पटकावले.
कोडोली येथील डॉ जयंत पाटील हॅन्डबॉल अकॅडमीच्या वतीने खुल्या पुरुष गटाचा निमंत्रितांच्या राज्यस्तरीय हॅन्डबॉल स्पर्धेत २० संघाच्या माध्यमातून २८० खेळाडूनी सहभाग घेतला होता. दिवसरात्र विद्युत झोतात सलग दोन दिवस यशवंत हायस्कूलच्या क्रीडांगणावर या साखळी स्पर्धा पार पडल्या.स्पर्धात क्रिडा शौकिनानी मोठी गर्दी केली होती.
बी. ई. जी. स्पोर्ट्स (आर्मी) पुणे विरुद्ध मुंबई पोलीस यांच्यात अत्यंत अतितटीत झालेल्या अंतिम सामना ३४ विरुद्ध ३० गोलाचा होऊन बी. ई. जी. स्पोर्ट्स (आर्मी) पुणे यांनी ४ गोलने प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. त्यांना प्रथम क्रमांकाचे दहा हजार रोख रक्कम, शिल्ड व प्रशस्तीपत्र तर मुबंई पोलीस मुंबई यांना द्वितीय क्रमांकाचे रोख रक्कम सात हजार, चषक व मेडल्स व तृतीय क्रमांकाचे सांगरुळ स्पोर्ट्स सांगरुळ यांना रोख रक्कम पाच हजार , चषक व मेडल्स भारतीय महिला हॅन्डबॉल संघातील उज्वला जाधव (भरातद्वाज) यांच्या हस्ते देऊन गावरविण्यात आले. या स्पर्धेत पंच म्हणून अक्षय, प्रथमेश देवकर, संतोष पाटील ,नेहाल शिकलगार, अमित पाटील , राहूल रोकडे यांनी काम पाहिले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील, सतीश इंगळे उपस्थित होते प्रास्ताविक मोहन भोंगळे यांनी तर सूत्रसंचालन पंडित साळोखे यांनी केले व आभार सचिन फल्ले यांनी मानले.
या स्पर्धा पार पाडण्यासाठी डॉ. जयंत पाटील हॅन्डबॉल अकॅडमी चे अध्यक्ष पंडित साळोखे, उपाध्यक्ष सचिन फले व सचिव मेजर नजीर शेख, सुधीर सुतार,अतुल पाटील, अक्षय पाटील, राहुल भोसले, सूर्यकांत पाटील, सैफ फकीर, डॉ मयूर साळोखे, मनिष ऍडके, स्वप्नील पायमल यांनी परिश्रम घेतले.