बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात पूर्ण लॉकडाऊननंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा वेग मंदावला आहे. शनिवारी राज्यात ५,८१५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्याच वेळी राज्यात ११,८३२ रूग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले. दरम्यान शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली. सध्या राज्यात एकूण सक्रिय रुग्णची संख्या १,३०,८७२ वर पोहोचली आहे. राज्यात शनिवारी कोरोना संसर्गामुळे १६१ लोक मरण पावले आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ३३,७६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी राज्यात कोरोना सकारात्मकता दर ३.३८ टक्के होता.
दरम्यान, आरोग्य विभागाच्या माहितीनुसार बेंगळूर शहरी जिल्ह्यात १,२६३ नवीन रुग्णांची भर पडली आहे. याच वेळी २८२१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले. तर जिल्ह्यात शनिवारी २३ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला.