बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे पुन्हा वेगाने वाढत आहेत. ८० दिवसानंतर, मंगळवारी एका दिवसात एक हजाराहून अधिक लोकांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. आता पुन्हा बुधवारी १२०० हुन अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी सलग पाचव्या दिवशी बाधितांच्या संख्येत वाढ झाली. बुधवारी राज्यात ११३५ नवीन बाधितांची नोंद झाली होती. गेल्या वर्षी २५ डिसेंबरनंतर राज्यात पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या प्रकरणांची नोंद झाली होती. दरम्यान बुधवारी संख्या वाढली आहे. दरम्यान बुधवरी राज्यात १२७५ नवीन बाधितांची नोंद झाली आहे. तर चार बाधितांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात उपचाराधीन रूग्णांची संख्याही वाढत आहे. बुधवारी राज्यात ४७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यासह राज्यात कोविडच्या सक्रिय रूग्णांची संख्या १०,२२० वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे एकूण १२,४०७लोक मरण पावले आहेत. आतापर्यंत एकूण संक्रमित रुग्णांची संख्या ९,६३,६१४ वर पोहोचली आहे. तर यापैकी ९,४०,९६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे. बुधवारी जिल्ह्यात ७८६ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. तर २७१ रुग्ण कोरोनावर मत करत रुग्णालयातून घरी परतले आहेत.