प्रतिनिधी / बांदा:
राज्य उत्पादन शुल्कच्या सिंधुदुर्ग भरारी पथकाकडून आज पहाटे बांदा – दोडामार्ग मार्गावरील संतोषी माता हॉलसमोर गोवा बनावटीच्या दारु वाहतुकी विरोधात कारवाई करण्यात आली. यात तब्बल २ लाख ११ हजार २०० रुपयांच्या दारुसह १ लाखांची कार( एमएच 43 व्ही 9254)असा एकूण ३ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गणेश कृष्णा नार्वेकर (३०, रा. माणगाव, मळावाडी, ता. कुडाळ) याला ताब्यात घेण्यात आले. त्यात विविध ब्रँडचे ४४ दारुचे बॉक्स आढळून आल्याने कार व दारु ताब्यात घेण्यात आली. ही कारवाई जिल्हा अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी याच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. के. दळवी यांच्या सह कर्मचारी यांनी केली.