ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सफाई कामगारांच्या खांद्यावर हात ठेवून काढलेला फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. टेनिस खेळण्यासाठी शिवाजी पार्कवर आलेल्या राज ठाकरेंसोबत अनेकांनी फोटो काढले. मात्र यावेळी सफाई कामगारांसोबतच्या त्यांची फोटोची चर्चा सर्वाधिक आहे.
राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे हे नेहमीप्रमाणे शिवाजी पार्कमध्ये टेनिस खेळण्यासाठी आले होते. त्यावेळी शिवाजी पार्क परिसरात काम करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे फोटो काढण्याची विनंती केली. राज ठाकरे यांनीही कर्मचाऱ्यांच्या विनंतीला मान दिला आणि फोटो काढण्यासाठी पुढे आले. यावेळी राज ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि दिलखुलासपणे फोटो काढला.
मुंबई दिवसरात्र स्वच्छ ठेवणाऱ्या या सफाई कर्मचारीऱ्यांना या फोटोच्या माध्यमातून खऱ्या अर्थांने कोविड योध्दा असलेल्याचे प्रशस्तीपत्रक दिवाळीत मिळाले आहे, असेही त्यांनी यात म्हटले आहे.