बेळगाव : जय हनुमान स्पोर्टस् आंबेवाडीतर्फे रामचंद्र आण्णाप्पा मन्नोळकर चषक हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध संघांनी भाग घेतला होता. या चषकावर नील स्पोर्टस् हिंडलगा चषकाने आपले नाव कोरले आहे.
विजेत्या संघाला 11 हजार रुपये व चषक देवून गौरविण्यात आले. संघाचे कर्णधार संतोष नाईक यांनी प्रथम फलंदाजी करत एसआरएस अनगोळ संघाला 5 षटकात 35 धावांचे लक्ष्य दिले. मात्र नील स्पोर्टस् संघाने एसआरएस अनगोळ संघाला 12 धावांनी हरवून जेतेपद मिळविले.