आमदार दयानंद सोपटे यांचे आश्वासन
मोरजी /प्रतिनिधी
गोव्यात साहसी खेळात समाविष्ट झालेल्या रायफल शूटिंगला राज्य तसेच केंद्र सरकारच्या क्रीडा खात्याकडून सर्वोतोपरी आर्थिक सहाय्य दिले जाईल तसेच मांदे येथे नव्यानेच सुरू केलेल्या यश अकादमीच्या शूटिंग रेंज ला देशात नंबर वन बनवले जाईल असे प्रतिपादन मांदे मतदार संघाचे आमदार तथा पर्यटन महामंडळाचे चेअरमन दयानंद सोपटे यांनी केले.
मांदे सच्चे भाटले येथे गोवा रायफल शूटिंग असोसिएशन आणि यश शूटिंग अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शूटिंग चॅम्पयिन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी व्यास पीठावर खास निमंत्रित म्हणून गोवा विधान सभेचे माजी सभापती उल्हास अस्नोडकर, आंतर राष्ट्रीय कीर्तीचे रायफल शूटर एड.विक्रम भांगले, युवराज साळु?खे, भाग्यश्री पाडलोस्कर,योगेश पाडलोस्कर,यश पाडलोसकर ,प्रशासकीय सनदी अधिकारी प्रवीण गावस, रायफल शूटिंग असोशियायेशन चे अध्यक्ष किशोर शेट मांदेकर,उपाध्यक्ष मुकुंद कायसुकर ,आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सोपटे म्हणाले मांदे सारख्या ग्रामीण भागात यश शूटिंग अकादमीने आंतर राष्ट्रीय दर्जाची शूटिंग रेंज सुरू करून इथल्या युवकांना एक व्यासपीठ मिळवून दिले आहे त्याचा लाभ घेवून इथल्या युवकांनी रायफल शूटिंग मद्धे आपले करियर घडवावे.तसेच मांदे गावा बरोबर राज्याला नाव मिळवून द्यावे असे सांगून रायफल शूटिंग असोशियेशन ला सर्वोतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले.यावेळी या राज्य स्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत बक्षिसे मिळवलेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना माजी उपसभापती उल्हास अस्नोडकर म्हणाले,यश शूटिंग अकादमी गोव्याचे क्रीडा क्षेत्रातील वैभव आहे रायफल सारख्या साहसी खेळात पाडलोस कर कुटुंबीयांनी गोव्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवून दिले आहे रायफल असोशिये शनचे कार्यही उल्लेखनीय आहे या खेळात चिकाटी आणि ऐकाग्रते ला अत्यंत महत्व आहे आज खेळला अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे अश्यावेळी पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
यावेळी रायफल शूटिंग मद्धे विविध प्रकारात पदके मिळवलेल्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पदके प्रदान करण्यात आली.तसेच या खेळात आंतर राष्ट्रीय स्तरावर चमकल्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.त्यात एड्.विक्रम भांगले, युवराज साळु?खे, भाग्यश्री पाडलोस्कर,योगेश पाडलोस्कर ,यश पाडलोस्कर, यांचा समवेश होता.
प्रारंभी विठोबा बगळी,संजय तारी, साईश कायसूकर इत्यादींनी मान्यवरांना फुलाची रोपटी देवून स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर शेट मांदेकर, भाग्यश्री पडलोस्कर,यश पडलोस्क र,यांनी केले शेवटी किशोर शेट मांदेकर यांनी आभाप्रदर्शन केले 3ते 5 मार्च दरम्यान यश शूटिंग अकादमी म्हापसा आणि यश शूटिंग रेंज मांदे येथे तीन दिवस पार पडलेल्या या राज्य स्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत गोव्यातील अनेक पुरुष महिला ,युवक तसेच मुला मुलींनी भाग घेतला.