मच्छेतील क्रिकेट स्पर्धेत महिला विभागात बेळगाव रेड संघाने पटकावले जेतेपद
वार्ताहर / किणये
मच्छे क्रिकेट क्लब यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या हाफ पिच क्रिकेट स्पर्धेमध्ये रायबाग कुडची येथील हिंदुस्थान संघाने विजेतेपद पटकावले तर एसआरएस हिंदुस्थान बेळगाव संघाला उपविजेतेतेपद मिळाले.
गेल्या 15 दिवसांपासून प्रकाशझोतात कुडतूरकर ग्राऊंड (दुर्गा मैदान) येथे महिलांसाठी विशेष स्पर्धा घेण्यात आली. या विभागात बेळगाव रेड संघाने जेतेपद आणि बेळगाव ब्ल्यू संघाने उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेमध्ये एकूण 75 संघांनी सहभाग घेतला होता. त्यात बेळगाव, खानापूर, बागलकोट, दांडेली, हल्याळ, कोल्हापूर, सांगली, नाशिक, नागपूर येथील संघांचा समावेश होता. मच्छे क्रिकेट क्लबचे अध्यक्ष कृष्णा जैनोजी, राष्ट्रीय महिला क्रिकेटपटू अनुजा पाटील, तसेच दीपक तरनाळे, असद हुजदार, विवेक भादवणकर, रामचंद्र चलवेटकर, संतोष जैनोजी, गजानन जैनोजी आदींच्या हस्ते बक्षीसवितरण केले. पुरुषांमधील विजेत्या संघाला 77,777 व उपविजेत्या संघाला 37,777 रु. देण्यात आले.