31-01-2024 ते 6.2.2024
क्र. विशेष तारीख
1 शुभ दिवस 1 दु. 02.03 प., 2, 4 स. 07.20 नं, 6 सायं. 07.32 प., 7 02.0 प., 10,11, 12, 13 दु. 02.42 नं, 14, 15, 16 स.08. 46 प, 17 08.45 ते 1.42 प, 18 उ. 2.37 नं, 19 रा.09.18 प., 09.55 नं, 21, 22, 23 दु. 03.33 प, 24, 25, 26, 27 द.g 01 प., 28, 29
2 अशुभ दिवस 03, 05, 08, 09
3 सण/ उत्सव/ विशेष तिथी 04- कलावती देवी उत्सवारंभ, 06- षटdितला एकादशी, 13- गणेश जयंती, 16- रथसप्तमी, 20- जया एकादशी, 26- बेळगाव मोहनगा यात्रा, 27- मराठी भाषा दिन, 28- संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय 09.49)
4 अमावास्या/ पौर्णिमा अमावास्या 09-02-2024 सकाळी 08.02 ते उत्तर रात्री 04.28 पर्यंत पौर्णिमा 23-02-2024 दुपारी 03.33 ते 24-02-2024 सायंकाळी 05.59 पर्यंत
5 साखरपुड्याचे मुहूर्त 1- दु. 2 प., 2, 4, 6, 10, 13 दु. 3 नं., 14, 18- दु. 1 नं., 24, 26, 8, 29
6 बारसे (नाव ठेवण्या चे) मुहूर्त 2 – दु. 4 प., 4, 11- सायं 6 प., 14 – दु. 12 प., 18 – दु. 1 नं, 9, 21, 26, दु.- 1 प., 29
7 जावळाचे मुहूर्त 1, 2, 11, 14, 15- स. 09 प., 19- स. 11 प., 21, 22, 28, 29
8 भूमिपूजनाचे/ पायाभरणीचे मुहूर्त 07- स. 09.48 ते दु. 02.02 प., 12- दु. 4 प., 14- स. 10.42 प., 15- स. 09 नं., 22- दु. 01.21 प., 24- दु 4 प, 26- दु 03.25 प
9 गृहप्रवेशाचे मुहूर्त (व्यावहारिक मुहुर्त) 01- दु 2 प, 02, 10, 11, 14, 19 स. 11 प., 21, 22- दु. 1 प., 26, 29
10 वास्तूशांती चे मुहूर्त(व्यावहारिक) 01 – दु. 12 ते 4 प., 2- दु. 12.53 प., 19 – स. 10.32 प., 21- सायं 4 प., 22 – दु. 01.21 प., 26 – दु. 03.25 प., 29 दु. 4 प.
11 व्यापार सुरू करण्याचे मुहूर्त 1, 2- दु. 12 प., 19- स. 10.30 प., 21, 22- दु. 1 प., 29
12 वाहन खरेदी चे मुहूर्त 1- दु. 12 प., 2- दु. 12.30 प., 21, 22 – दु. 01.15 प., 29
13 शेत जमीन/जागा/ प्रॉपर्टी/ फ्लॅट खरेदीसाठीचे मुहूर्त 1- दु. 12 प., 2- दु. 12.30 प., 21, 22 – दु. 01.15 प., 29
14 शेतीच्या कामांसाठी उपयुक्त दिवस 7, 19, 21, 29
15 डोहाळे मुहूर्त 14 – स. 11 नं. 18- दु. 1 नं., 19- स. 10 प., 20 दु. 12 नं., 21, 22 सायं 5 प., 27 दु. 1 प.
16 पंचक शनिवार 10-02-2024 सकाळी 10.02 पासून बुधवार 14-02-2024 सकाळी 10.44 पर्यंत
फेब्रुवारी महिन्यातील लौकिक मुहूर्त आणि इतर माहिती
मेष
उष्णतेचे विकार संभवतात. पोटाच्या तक्रारी वाढतील. डोळ्यांना त्रास होण्याची शक्मयता आहे. कुटुंबातील वातावरण समाधानकारक असेल. धनप्राप्ती उत्तम होईल. प्रवास घडेल. स्थावरकारकसंबंधी उत्तम ग्रहमान आहे. शेअर्ससारख्या गुंतवणुकीतून फायदा. नोकर वर्गाला त्रास संभवतो. वैवाहिक जीवन समाधानकारक.
उपाय: पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी घाला.
वृषभ
तब्येत समाधानकारक राहील. रखडलेली कामे पूर्ण होतील. अपेक्षित धनप्राप्ती होईल. कुटुंबात मंगल कार्य संभवते. एक छोटी पार्टी आयोजित कराल. प्रवास घडेल. घर खर्चात वाढ होईल. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. नोकर वर्गाला जास्त कष्ट संभवतात. वैवाहिक जोडीदाराबरोबर मतभेद होतील.
उपाय: मारूतीला मधाचा अभिषेक करावा
मिथुन
उत्तम आरोग्याकरता व्यायामाची कास धराल. परिवारातील वातावरण अनुकूल असेल. पैशांच्या बचतीमध्ये वाढ होईल. लहान भावाबरोबर किंवा बहिणीबरोबर वाद संभवतो. आईच्या सल्ल्यामुळे फायदा होईल. शेअर्समध्ये नुकसान संभवते. नोकरीमध्ये वादाचे प्रसंग येतील. वैवाहिक जीवन क्लेशदायक असेल.
उपाय: रूईच्या पानावर शेंदूर लावून माऊतीला अर्पण करावे
कर्क
पैशाची येणी कमी झाल्यामुळे थोडे त्रस्त व्हाल. कुटुंबात वाद संभवतो. एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या बोलण्याने वादावादीची शक्मयता आहे. जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील. वाहन खरेदीचे योग आहेत. धोकादायक गुंतवणूक टाळावी. प्रेमींनी योग्य वेळेची प्रतीक्षा करावी. नोकरीत मान-सन्मान वाढेल. एखाद्या जवळच्या ठिकाणी सहल काढायचा विचार कराल. व्यवसायामध्ये वाढ होईल.
उपाय: पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे
सिंह
अपचन होणे किंवा दूषित अन्न खाल्ल्याने तब्येत बिघडू शकते. पैशाची आवक ठीक-ठाक राहील. प्रवास टाळावा. वाहन विषयक तक्रार जाणवेल. गुंतवणुकीतून फायदा होईल. संततीकडून सुवार्ता कळेल. प्रेमींना उत्तम काळ आहे. नोकरीत सोबत काम करणाऱ्यामुळे किंवा वरिष्ठांमुळे त्रास होईल. वैवाहिक सुख उत्तम असेल. समाजात मान-सन्मान वाढेल. सगळ्या प्रकारचे लाभ होतील.
उपाय :रात्री दुधाचे सेवन करू नये
कन्या
‘ज्याचे करावे भले तो म्हणतो आपलेच खरे’ याचा पदोपदी अनुभव येईल. म्हणून न मागता सल्ला देऊ नका. दुसऱ्याच्या अनुभवाचा फायदा होईल. कामाच्या ठिकाणी एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. समाजामध्ये मान-सन्मान वाढेल. पैशांची आवक सर्वसामान्य राहिल. गुडघ्याला किंवा पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे. वाहन जपून चालवावे. वैवाहिक जीवन उत्तम असेल.
उपाय :कुत्र्याला चपाती घाला
तूळ
आरोग्याविषयी गाफील राहून चालणार नाही. छोटा मोठा आजार त्रास देऊ शकतो. पोटाची तक्रार किंवा त्वचेविषयी समस्या येऊ शकते. कुटुंबाच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. साहस वाढेल. एखादे मोठे काम करण्याची योजना आखाल. प्रेमींनी वाद-विवाद टाळावा. संततीची काळजी वाटेल. नोकरीत प्रमोशन किंवा इन्क्रिमेंटचे योग आहेत. वैवाहिक जोडीदाराशी विनाकारण वाद होईल.
उपाय :मुंग्यांना साखर घालावी
वृश्चिक
जे काम कराल ते आत्मविश्वासाने कराल. नवीन कल्पना सुचतील. कौटुंबिक सुख उत्तम असेल. कुटुंबातील सदस्य एकमेकाला सहयोग करतील. सहलीला जाताना ते ठिकाण धोकादायक नाही ना याचा विचार करा. आईची थोडी चिंता वाटेल. गुंतवणुकीकरता योग्य वेळ आहे. नोकरदार वर्गाने कामात चूक होऊ देऊ नये. जोडीदाराशी मतभेद संभवतात. व्यवसायात प्रगती होईल.
उपाय: पंचगव्याचे सेवन करावे
धनु
आपल्या चारित्र्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असेल. कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला किंवा मोहाला बळी पडू नका. नवीन प्रेम संबंध सुरू होण्याची शक्मयता आहे. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पोटाचे विकार त्रास देऊ शकतात. धनप्राप्तीच्या बाबतीत नशीबवान असाल. प्रवास शक्यतो टाळा.
उपाय: विहिरीत एक चमचा दूध टाकावे
मकर
कौटुंबिक दृष्टीने समाधानकारक काळ आहे. कुटुंबातील व्यक्तींमध्ये सुसंवाद घडेल पण एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रासही होऊ शकतो. तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. संकट येण्याची शक्मयता आहे. पण अडचणीतून मार्ग निघतील. वैवाहिक जीवनात सुखमय वातावरण असेल. नको ती काळजी करण्याची सवय सोडून द्यावी.
उपाय :कामाला निघताना तुळशीचे पान तोंडात ठेवावे
कुंभ
पार्टनरबरोबर किंवा वैवाहिक जोडीदाराबरोबर मतभेद होण्याची शक्मयता आहे. घरात आणि कामाच्या ठिकाणी काहीसे टेन्शनचे वातावरण असू शकते. एखाद्या धार्मिक तीर्थस्थळाला भेट देण्याचा विचार करा. प्रवास घडेल आणि प्रवासातून फायदा होण्याची शक्मयता आहे. जवळच्या मित्रांपैकी कोणालाही कसलेही आश्वासन देऊ नका.
उपाय :वाहत्या पाण्यात हळकुंड सोडावे
मीन
दूरच्या नातेवाईकांची भेट होऊ शकते किंवा त्यांच्याशी संपर्क होऊ शकतो. धनप्राप्ती समाधानकारक असेल. घरात छोटे-मोठे फंक्शन होऊ शकते. तब्येतीची विशेष काळजी करू नका आणि तणाव घेऊ नका. प्रवासामध्ये चांगल्या संधी प्राप्त होण्याची शक्मयता आहे. प्रॉपर्टीचे व्यवहार टाळा. नोकरीमध्ये फायदा असेल.
उपाय :काजळाची डबी जवळ ठेवा