रवि. 28 जून ते 4 जुलै 2020
मेष
या सप्ताहात गुरु धनुराशीत वक्री, गुरु, प्लुटो युती होत आहे. धावपळ, दगदग वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. तुमचा राग वाढवण्याचा प्रयत्न विरोधक करतील. प्रवासात घाई नको. धंद्यात फायदा होईल. नोकरीत काम वाढले तरी प्रभाव तुमचाच राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ रहा. तुमच्या कामात तुम्ही व्यस्त रहा. कला, साहित्यात प्रगती करता येईल. मुले मदत करतील.
वृषभ
या सप्ताहात धनु राशीत गुरु वक्री, सूर्य, बुध युती होत आहे. धंद्यात वाढ होईल. मोठे कंत्राट मिळवता येईल. वसूली करा. नोकरीत कामे वेळेवर पूर्ण करा. भलत्या क्यक्तीचा सल्ला घेऊ नका. घरातील समस्या वेळेवर सोडवा. वरि÷ांना कमी लेखू नका. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा राहील. लोकांच्या मदतीला जाल. मागे राहू नका. कला, साहित्यात संधी मिळेल.
मिथुन
धनुराशीत गुरु वक्री, सूर्य, बुध युती होत आहे. सप्ताहाच्या शेवटी घरात, मैत्रीत तणाव होईल. धंद्यात सावधपणे व्यवहार करा. फसगत टाळा. नोकरीत तुमची गरज वरि÷ांना वाटेल. प्रगतीची संधी मिळेल. खाण्याची काळजी घ्या. अनाठायी पैसा खर्च करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात पुन्हा जोमाने कार्य करून स्थिर व्हा. अभ्यास करा.
कर्क
या सप्ताहात धनु राशीत गुरु वक्री, चंद्र, मंगळ त्रिकोण योग होत आहे. महत्त्वाची कामे करून घेता येतील. नम्रता ठेवा. अरेरावी केल्याने तुमचा अपमान होईल. सावध रहा. कायदा पाळा. नोकरीत वरि÷ांची नाराजी सहन करावी लागेल. घरात मतभेद होतील. चर्चा करतांना शब्द जपून वापरा. राजकीय, सामाजिक कार्यात दबाव राहील. प्रकृतीची काळजी घ्या.
सिंह
या सप्ताहात धनु राशीत गुरु वक्री, सूर्य, बुध युती होत आहे. तुमच्या धंद्यात वाढ होईल. वसुली करा. रागावर ताबा ठेवा. प्रवासात घाई करू नका. नोकरीत तुम्हाला मानाचे स्थान मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात चुका सुधारता येतील. अधिक वेगाने कामे होतील. अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल. कला-साहित्यात चमकाल. कल्पना सुचेल.
कन्या
या सप्ताहात धनु राशीत गुरु वक्री, सूर्य, बुध युती होत आहे. धंद्यात सुधारणा होईल. नवे काम परिचयातून मिळवण्याचा प्रयत्न करा. नोकरीत प्रभाव वाढेल. बदल करण्याची संधी येईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व राहील. तुमच्या मनातील राग दिसून येईल. संसारात सुखद समाचार मिळेल. वाहन हळू चालवा. कायदा पाळा. कला, साहित्यात विचारांना चालना मिळेल.
तुळ
26 जून रोजी धनु राशीत गुरु वक्री, सूर्य, बुध युती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला घरात, धंद्यात तणाव होईल. रागावर ताबा ठेवा. विरोध मोडून काढण्याचा प्रयत्न राजकीय, सामाजिक कार्यात करता येईल. विरुद्धलिंगी व्यक्तीकडून मनस्ताप होऊ शकतो. नोकरीत प्रभाव पडेल. संसारातील तणाव कमी करता येईल. कला, साहित्यात तुमची कल्पकता वाढेल.
वृश्चिक
या सप्ताहात धनु राशीत गुरु वक्री, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. धंद्यात सौम्य धोरण ठेवा. समोरच्या क्यक्तीच्या मागणीनुसार माल पुरवा. वसुली करा. नोकरीत शत्रूत्व वाढवू नका. वरि÷ांचा कल पाहून मत व्यक्त करा. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी वाढतील. तुमच्यावर टीका होईल. इतरांना कमी लेखू नका. स्वत:ची काळजी घ्या.
धनु
या सप्ताहात तुमच्याच राशीत गुरु वक्री, सूर्य, बुध युती होत आहे. सप्ताहाच्या शेवटी मनस्ताप होईल. प्रकृतीची काळजी घ्या. नमते धोरण ठेवा. बी. पी. वाढेल. धंद्यात काम मिळेल. नोकरीत तुमचे महत्त्व अधिक वाढेल. राजकीय, सामाजिक कार्याची नीटपणे आखणी करा. योजना बनवा. संधी मिळेल. प्रवासात सावध रहा. नवीन परिचयावर एकदम विश्वास ठेवू नका. वस्तू सांभाळा.
मकर
29 जून रोजी धनु राशीत गुरु वक्री, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. साडेसाती सुरू आहे. महत्त्वाची कामे करण्याची जिद्द ठेवा. धंद्यात काम मिळेल. तडजोड करावी लागेल. मनमानी कुठेही करू नका. कायद्याचे धोरण लक्षात ठेवा. नोकरी टिकवा. सहनशीलता वाढवावी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्ही प्रसंगावधान ठेवा. तटस्थ रहा. कलाक्षेत्रात प्रगती होईल.
कुंभ
या सप्ताहात धनु राशीत गुरु वक्री, सूर्य, बुध युती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला मनस्ताप होईल. डोळय़ांची काळजी घ्या. धंद्यात नवा पर्याय सुचेल. समस्या सोडवता येईल. नोकरीत जबाबदारी घ्यावी लागेल. तुमचे महत्त्व वाढेल. राजकीय- सामाजिक कार्यात योजनांना वेग देता येईल. नव्या कार्याचा आरंभ होऊ शकेल. बस्तान नीट बसवण्याची तयारी करा. घरात सुखद वातावरण राहील.
मीन
या सप्ताहात धनु राशीत गुरु वक्री, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. धंद्यात जम बसेल. वसुली करा. मालाची विक्री योग्य पद्धतीने करता येईल. आक्रमकता वाढेल. नोकरीत काम वाढेल. राजकीय-सामाजिक कार्याला नवे वळण देता येईल. अधिकार प्राप्ती होऊ शकते. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरेल. सुखद समाचार संसारात मिळेल. कला साहित्यात चमकाल.