रविवार 1 ते 7 नोव्हेंबर 2020
मेष
या सप्ताहात सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, गुरु प्रतियुती होत आहे. धंद्यात नमते धोरण उपयुक्त ठरेल. गिऱहाईकांच्या बरोबर वाद वाढवू नका. हिशोब नीट करा. संसारात क्षुल्लक नाराजी होईल. व्यसनी व्यक्तीच्याकडून मनस्ताप होऊ शकतो. तुमची प्रति÷ा वाढेल. शिक्षणात आळस करू नका. साहित्यात प्रगती कराल. प्रवासात खाण्याची काळजी घ्या.
वृषभ
या सप्ताहात सूर्य, चंद्र षडाष्टक योग, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात गोड बोलण्याने फायदा होईल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. वरिष्ठना विरोध करू नका. नोकरी सांभाळा. संसारातील कामे होतील. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणीवर मात करता येईल. वरिष्ठच्या शब्दाचा मान ठेवावा लागेल. कला क्षेत्रात संधी मिळेल. परीक्षेसाठी जास्त तयारी करा.
मिथुन
या सप्ताहात सूर्य, चंद्र त्रिकोण योग, चंद्र, गुरु प्रतियुती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या कामात अडचणी येतील. धंद्यात वाढ करू शकाल. मागील येणे वसूल करा. नोकरीत कामाचे कौशल्य दिसून येईल. राजकीय, सामाजिक कार्याला गती मिळेल. महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न करा. अनुभवी व्यक्तीचा सल्ला उपयुक्त ठरेल. कला, साहित्य, शिक्षणात प्रगती होईल. घरात चांगली बातमी मिळेल.
कर्क
या सप्ताहात बुध, शनि केंद्रयोग, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात वाढ होईल. चर्चा सफल होईल. जुने येणे वसुल करा. बोलण्यात सावध रहा. नोकरीत वरि÷ांच्या सल्ल्यानुसार काम करावे लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात नकळत चूक होऊ शकते. अहंकाराची भाषा वापरू नका. संसारात मुलांच्यासाठी विशेष निर्णय घ्याल. कला, साहित्य, शिक्षणात मेहनत घ्या. यश मिळेल. मैत्री वाढेल.
सिंह
या सप्ताहात सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, गुरु प्रतियुती होत आहे. धंद्यात फायदा वाढेल. नवे काम घ्या. चर्चा चांगली होईल. योग्य लिखापढी करून ठेवा. वसुली करा. नोकरीत वरिष्ठना खूष कराल. राजकीय, सामाजिक कार्यात कठीण निर्णय लवकर घ्या. योग्य सल्ला घेता येईल. लोकांचे, नेत्यांचे सहकार्य मिळेल. प्रश्न रेंगाळत ठेवू नका. संसारात चांगली घटना घडेल. नवीन ओळखी होतील. कला, साहित्य, शिक्षणात यश मिळेल.
कन्या
या सप्ताहात चंद्र, बुध त्रिकोण योग, चंद्र, मंगळ लाभयोग होत आहे. रविवारी संयमाने वागा. धंद्यात फायदा होईल. जुना वाद मिटवता येईल. नोकरीत वर्चस्व राहील. वरिष्ठना खूष कराल. संसारातील कामे होतील. प्रेमाला चालना मिळेल. राजकीय, सामाजिक कार्याला नवी दिशा मिळेल. लोकप्रियेत वाढ करणारी योजना राबवा. प्रकृती सुधारेल. कला, साहित्य, शिक्षणात यश प्रयत्नाने मिळवता येईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल.
तुळ
या सप्ताहात चंद्र, गुरु त्रिकोण योग, शुक्र, हर्षल षडाष्टक योग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला अडचणी येतील. गैरसमज होईल. धंद्यात सावधपणे व्यवहार करा. खाण्याची काळजी घ्या. संसारात तणाव क्षुल्लक असेल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. जवळचे लोक हेवा करतील. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती करा. योजना पूर्ण करा. क्षुल्लक व्यक्तीला सुद्धा कमी समजू नका. शिक्षणात आळस नको. परीक्षा द्या.
वृश्चिक
या सप्ताहात चंद्र, शुक्र त्रिकोण योग, चंद्र, गुरु प्रतियुती होत आहे. धंद्यात काम मिळवणे सोपे समजू नका. मैत्रीचा उपयोग होईल. दादागिरी कुठेही काम करू नका. नोकरीच्या कामात चूक करू नका. विरोध होईल. राजकीय, सामाजिक कार्यात विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. विरोधक आक्रमक होतील. समोरची व्यक्ती दिलेला शब्द पाळणार नाही. राग आवरा. आळस नको.
धनु
या सप्ताहात सूर्य, चंद्र त्रिकोण योग, चंद्र, गुरु प्रतियुती होत आहे. धंद्यात क्षुल्लक समस्या येईल. रागावर ताबा ठेवा. मागील येणे वसूल करा. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. संसारात शुभ समाचार मिळेल. संतती प्राप्तीचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक कार्यात वेगाने प्रगती करता येईल. चर्चा, भेट यशस्वी होईल. महत्त्वाचे कठीण काम करून घ्या. कला, साहित्य, शिक्षणात पुढे जाल.
मकर
चंद्र, शुक्र त्रिकोण योग, सूर्य, चंद्र त्रिकोण योग या सप्ताहात होत आहे. धंद्यात सुधारणा होईल. मागील येणे वसूल करा. नोकरीत तुमच्यावर मोठी जबाबदारी दिली जाईल. तुम्ही यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर लोकांचा विश्वास वाढेल. मान, प्रतिष्ठ मिळेल. मोठय़ा योजनांचा विचार करता येईल. संसारातील समस्या कमी होईल. ओळखी वाढतील.
कुंभ
या सप्ताहात सूर्य, चंद्र त्रिकोण योग, शुक्र, हर्षल षडाष्टक योग होत आहे. जवळच्या लोकांना तुमचा राग येईल. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. खर्च वाढेल. धंद्यात गोड बोला. नवे काम मिळवता येईल. नोकरीत वर्चस्व वाढेल. कामाचा व्यापही वाढेल. संसारात गैरसमज होईल. विरुद्धलिंगी व्यक्तीच्या शब्दावर जास्त विश्वास ठेवू नका. खाण्याची काळजी घ्या. शिक्षणात मागे राहू नका.
मीन
या सप्ताहात चंद्र, शुक्र त्रिकोण योग, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. उत्साह टिकून राहील. धंद्यात काम मिळेल. संयमाने बोला. नोकरीत रागावर ताबा ठेवा. काम वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व कमी होईल. बोलण्यात चूक होईल. सावध रहा. प्रवासात घाई करू नका. मागील येणे वसूल करा. वृद्ध व्यक्तींची चिंता वाटेल. अभ्यासात मागे राहू नका.