रविवार दि.29 नोव्हेंबर ते दि.5 डिसेंबर 2020
मेष
या सप्ताहात सूर्य-चंद्र षडाष्टक योग, चंद्र-शुक्र त्रिकोण योग होत आहे. सप्ताहाच्या शेवटी तणाव-वाद होईल. अरेरावी करू नका. वाहन हळू चालवा. नोकरीत वरिष्ठांची नाराजी होऊ शकते. काम वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या कामाला महत्त्व दिले जाणार नाही. विलंबाने यश मिळेल. आरोपांना उत्तर द्यावे लागेल. संसारात मुलांची मदत मिळेल. वृद्ध व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. खर्च वाढेल. शिक्षणात आळस करू नका.
वृषभ
या सप्ताहात चंद्र-बुध प्रतियुती, चंद्र-गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात वाढ करण्याची संधी मिळेल. गोड बोला. गिऱहाईकाबरोबर वाद टाळा. वस्तु नीट सांभाळा. नोकरीतील तणाव कमी होईल. वरिष्ठांची मर्जी राखाल. राजकीय, सामाजिक कार्याला गती मिळेल. योजनांच्या मागे लागून जनहित साधता येईल. कुणालाही कमी समजू नका. व्यसन नको. पोटाची काळजी घ्या. अनोळखी क्यक्तीपासून सावध रहा. संसारात क्षुल्लक नाराजी होईल. शिक्षणात सरळमार्गे यश मिळवा.
मिथुन
या सप्ताहात चंद-मंगळ लाभयोग, चंद्र-शुक्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यातील चर्चा करताना संयम ठेवा, फायदा होईल. दादागिरीची भाषा त्रासदायक ठरेल. मोहाच्या नादी लागू नका. व्यवहारात अडकाल. कायदा पाळा. नोकरीत बेकायदा निर्णय त्रासदायक ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्यावर आरोप येईल. कामात चूक होईल. विरोधक आक्रमक होतील. संसारात आपली माणसे मदत करतील. कलाक्षेत्रात ओळखी होतील.
कर्क
या सप्ताहात चंद्र-गुरु प्रतियुती, बुध-गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात सुधारण्याचा प्रयत्न करा. नवे काम मिळेल. जुने येणे वसूल करा. नोकरीतील समस्या कमी होईल. सप्ताहाच्या मध्यावर क्षुल्लक तणाव होईल. राजकीय, सामाजिक कार्याला पुढे नेता येईल. मागील चुका सुधारून नव्या आत्मविश्वासाने कामाला सुरुवात करा. कला, साहित्य, शिक्षणात प्रगती होईल. ओळखी होतील.
सिंह
या सप्ताहात सूर्य-हर्षल षडाष्टक योग, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात कोणालाही वादाची संधी देऊ नका. चर्चा करताना रागावर ताबा ठेवा. मित्रांची मदत होईल. संसारात मुलांच्यासाठी चांगला निर्णय घेता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात गैरसमज, तणाव होईल. अनुभवी माणसाचा उपयोग करून घ्या. नोकरी टिकवा. सप्ताहाच्या शेवटी प्रवासात घाई नको.
कन्या
या सप्ताहात चंद्र-बुध प्रतियुती, बुध-गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात मनाप्रमाणे प्रगती होईल. ओळखीतून नवे काम मिळवण्याचा प्रयत्न करा. मागील येणे वसूल करा. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. कठीण काम करून दाखवाल. राजकीय, सामाजिक कार्याला गतिमान करण्याची तयारी करा. लोकसंग्रह वाढवा. जनहितासाठी योजना बनवा. कला,साहित्य, शिक्षणात पुढे जाल. घरातील समस्या कमी होईल.
तुळ
चंद्र-बुध प्रतियुती, सूर्य-चंद्र त्रिकोण योग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला तणाव होईल. गैरसमज होईल. धंद्यात गोड बोला. फायदा होईल. चर्चा यशस्वी होईल. मोठय़ा लोकांच्याकडून मदत मिळेल. नोकरीत वरि÷ांना खूष कराल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव पडेल. कायद्याच्या विरोधात जाऊ नका. कला, साहित्य, शिक्षणात मेहनत घ्या.
वृश्चिक
चंद्र-गुरु त्रिकोण योग, बुध-गुरु लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर तणाव, वाद होईल. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. धंद्यात व्यवहारात सावध रहा. फसगत टाळा. नवे काम मिळेल. नोकरीत तुमच्या बुद्धीचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे निर्णय महत्त्वाचे ठरतील. प्रति÷ा वाढेल. संसारातील कमी भरून काढा. शिक्षणात प्रगती होईल.
धनु
सूर्य-हर्षल षडाष्टक योग, चंद्र-शुक्र त्रिकोण योग होत आहे. साडेसाती सुरू आहे. घरातील वडील माणसांची काळजी वाटेल. वादविवाद वाढवू नका. धंद्यात हिशोब नीट करा. गोड बोलून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. नोकरी टिकवा. कायद्याच्या चौकटीत राहून कामे करा. राजकीय, सामाजिक कार्यात चूक होऊ शकते. प्रक्षोभक वक्तव्य टाळा. मारामारी नको. शिक्षणात मेहनत घ्या.
मकर
बुध-गुरु लाभयोग, सूर्य-चंद्र त्रिकोण योग होत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यातील समस्या सोडवा. प्रश्न रेंगाळत ठेवू नका. ग्रहांची साथ असताना मागे राहू नये. तुम्ही मेहनत घेणारे आहात. नोकरीत वरिष्ठांना खूष करता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात सुधारणा होईल. अधिकार वाढेल. संसारात चांगली बातमी मिळेल. कला, साहित्य, शिक्षणात प्रगती होईल.
कुंभ
चंद्र-बुध प्रतियुती, चंद्र-शुक्र त्रिकोण योग होत आहे. साडेसाती सुरू आहे. क्षुल्लक वाटणारी समस्या सुद्धा कधी कधी उग्र रुप धारण करते. त्यामुळे कायदा पाळा. धंद्यात वाढ होईल, वसुली करा. नोकरीत महत्त्व वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. लोकप्रियता मिळेल. जनहित कार्य करा. कला, साहित्य, शिक्षणात नवी संधी मिळेल.
मीन
बुध-गुरु लाभयोग, चंद्र-बुध प्रतियुती होत आहे. धंद्यात समोरच्या व्यक्तीला ओळखा, मग व्यवहार करा. जुना अनुभव विसरु नका. मित्र नेहमीच चांगले असतात असे नाही. नोकरीत महत्त्वाचे काम करून दाखवाल. राजकीय, सामाजिक कार्याला नवे वळण देता येईल. प्रतिष्ठां वाढेल. पद मिळेल. जवळच्या नेत्यांना ओळखून ठेवा. फसगत टाळा. शिक्षणात मागे राहू नका.