रविवार दि. 17 ते 23 मे 2020
मेष
रवि, गुरु त्रिकोण योग, चंद्र, मंगळ लाभयोग होत आहे. धंद्यात सुधारणा करण्याची संधी मिळेल. आर्थिक मदत मिळू शकेल. मालाची विक्री शेतकऱयाला करण्याचा मार्ग मिळेल. संसारात चांगली घटना घडेल. नोकरीत सप्ताहाच्या सुरुवातीला क्षुल्लक तणाव होईल. राजकीय, सामाजिक कार्यात योजनाबद्ध कार्यक्रम करता येईल. प्रति÷ा मिळेल. लोकांच्या समस्येवर योग्य उपाय शोधाल. विरोधक जमतील.
वृषभ
सूर्य, गुरु त्रिकोण योग, बुध, शुक्र युती होत आहे. धंद्यातील नुकसान कमी होईल. नवा मार्ग मिळेल. मदत करणारे लोक मिळतील. घरातील समस्या कमी होईल. नोकरीत सप्ताहाच्या शेवटी ताठर भूमिका घेऊ नका. नम्रता ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती करता येईल. कठीण काम करून घ्या. जनसंपर्क वाढवा. कला, साहित्यात विशेष घडेल.
मिथुन
चंद, मंगळ लाभयोग, चंद्र, हर्षल युती होत आहे. कायद्याच्या विरोधात कोणतेही काम करू नका. समस्या मोठे स्वरुप धारण करेल. प्रकृतीची काळजी घ्या. धंद्यात नुकसान टाळा. मोह ठेवू नका. नोकरीत कठीण काम करावे लागेल. नोकरी टिकवून ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर आरोप येऊ शकतो. बदनामी केली जाईल. गुप्त कट होईल. घरात गैरसमज होईल.
कर्क
सूर्य, चंद्र लाभयोग, बुध, शुक्र युती होत आहे. धंद्याला जम बसेल. कोणतेही काम करतांना कायद्याच्या विरोधात जाऊ नका. गुप्तशत्रू काडय़ा घालतील. रागावर ताबा ठेवा. दुखापत होण्याचा संभव आहे. नोकरीत प्रभाव पडेल. राजकीय, सामाजिक कार्याला गती मिळेल. जनहिताचा विचार करून योजना राबवा. घरातील समस्या कमी होईल. मुले आनंद देतील.
सिंह
सूर्य, चंद्र लाभयोग, बुध, शुक्र युती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला तणाव होईल. मन अस्थिर होईल. प्रकृती सांभाळा. समस्या सोडवाल. धंद्यात फायदा होईल. कायद्याच्या चौकटीत राहून नोकरीत कामे करा. रागावर नियंत्रण ठेवणे कठीण वाटेल. राजकीय, सामाजिक कार्यात विरोध करणारे लोक उघड होतील. तुम्हाला सहाय्य मिळेल. प्रति÷ा, लोकप्रियता मिळेल.
कन्या
सूर्य, गुरु त्रिकोण योग, बुध, शुक्र युती होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर तुमच्या कामात अडचणी येतील. धंद्यात वाढ होईल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. वाहन जपून चालवा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या मदतीने अनेकांना फायदा होईल. लोकसंग्रह तयार करा. अनेकांचे आशीर्वाद घ्या. त्याचाच उपयोग तुम्हाला होईल. जनसेवा हीच ईश्वर सेवा ठरते.
तुळ
चंद्र, मंगळ लाभयोग, चंद्र, हर्षल युती होत आहे. कठीण प्रसंगावर मात करावी लागेल. धंद्यात अडचण येईल. चुगलखोर लोक चुगली करतील. कायदा कुठेही मोडू नका. प्रकृतीची काळजी घ्या. खाण्यापिण्याचे तंत्र सांभाळा. नोकरी टिकवा. कोणताही मोह मनस्ताप देणारा ठरेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होईल. नम्र रहा. सहन करा.
वृश्चिक
रवि, चंद्र लाभयोग, बुध, शुक्र युती होत आहे. धंद्यात चांगली बातमी मिळेल. नवे काम मिळवता येईल. नोकरीत प्रभाव पडेल. वरि÷ांच्याबरोबर क्षुल्लक मतभेद होतील. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या कामाचे कौतुक होईल. प्रति÷ा वाढेल. आर्थिक सहाय्य जमा करता येईल. घरात आनंदी वातावरण ठेवता येईल. कला, क्रीडा, साहित्यात नवे शोधाल.
धनु
चंद्र, गुरु लाभयोग, चंद्र, हर्षल युती होत आहे. मानसिक, शारीरिक दडपण येईल. मन उदास राहील. सर्वावर मात करू शकाल. आवडत्या विषयात मन रमवा. धंद्यात नुकसान टाळा. हिशोब नीट करा. कायद्याचे पालन प्रत्येक ठिकाणीच करा. नोकरीत कटकटी होतील. घरातील व्यक्तीची काळजी वाटेल. राजकीय, सामाजिक कार्यात विरोधक खोडा घालण्याचा प्रयत्न करतील.
मकर
सूर्य गुरु त्रिकोण योग, बुध, शुक्र युती होत आहे. साडेसाती सुरू असली तरी समस्या सोडवता येईल. धंद्यात वाढ होईल. जास्त नफ्याच्या फंदात पडू नका. नियमांचे पालन करा. नोकरी टिकवता येईल. वरि÷ कामाचे कौतुक करतील. राजकीय, सामाजिक कार्यात अधिक शिकावयास मिळेल. विचारांना प्रेरणा मिळेल. प्रति÷ा वाढेल. कला, साहित्यात नाविन्य आणता येईल.
कुंभ
चंद्र, हर्षल युती, शुक्र, नेपच्यून केंद्रयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. तुमचा खंबीरपणा वाढेल. परंतु नम्रता ठेवा. कायद्याच्या चौकटीत राहून बोला, वागा. धंद्यात समस्या येणार नाही याकडे लक्ष ठेवा. नोकरीत कटकटी होतील. राजकीय, सामाजिक कार्यात राग वाढवणारी घटना घडेल. सहनशीलता ठेवा. प्रति÷ा सांभाळून कार्य करत रहा. जनसेवा टाळू नका. घरात नाराजी होईल.
मीन
सूर्य, चंद्र लाभयोग, बुध, शुक्र युती होत आहे. कोणतेही काम करतांना रागावर नियंत्रण ठेवा. नको तेवढा स्पष्टवक्तेपणा समस्या घेऊन येईल. धंद्यात सुधारणा होईल. शेअर्समध्ये फायदा होईल. नोकरीत वर्चस्व वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात जनहितांचा निर्णय घ्याल. मदत कराल. लोकसंग्रह जमा करा. नि:स्वार्थी सेवा ईश्वरचरणी रुजू होते.