बुधवार दि.23 डिसेंबर ते मंगळवार दि. 29 डिसेंबर 2020
लोकांना उपाय सांगताना सावधगिरी बाळगा
काही व्यवसायातील लोकांचा शेवटचा काळ अतिशय वाईट जातो. याचे कारण काय? असा प्रश्न अनेक जण छद्मीपणाने विचारत असतात. त्यांच्या मनात काय आहे हे कळणे अवघड असले तरी त्या प्रश्नात काहीतरी अर्थ आहे व त्या प्रश्नाचे उत्तर मिळणे आवश्यक आहे असे मला वाटले. माझ्या आजवरच्या अभ्यासातून काही गोष्टी दिसून आल्या. त्याचा अंतर्मुख होऊन विचार केला असता याचे उत्तर बरोबर सापडते. त्यानुसार आचरण केल्यास कुणाला कोणताही त्रास होणार नाही. ज्योतिषी, भटजी, गुरव, पुजारी, स्वामी, संतमंडळी किंवा पुरोहित अथवा अंगात येण्याचा बहाणा करणारे यांच्याकडे अनेक लोक विविध प्रकारच्या समस्या घेऊन येत असतात. त्यात काही गंभीर असतात, काही साध्या असतात. जर कोणी सांगितले की, अमुक माणूस मला त्रास देत आहे, माझ्या कामात अडथळे आणत आहे, जगणे मुश्कील करून टाकले आहे. त्याचा काटा कसा काढायचा किंवा त्याला माझ्या मार्गातून दूर कसे करायचे, त्यासाठी काहीतरी उपाय सुचवा. त्यानुसार त्याला काही उपाय, विविध तऱहेच्या शांती, मंत्रतंत्र, पूजा, जपतप, ताईत, गंडेदोरे, भस्म वगैरे मार्गाने उपाय सुचविले जातात. तर काहीजण याही पलीकडे जाऊन मुक्मया प्राण्यांचे बळी वगैरे अघोरी प्रकारही सुचवीत असतात. विचारणाऱयाचे काम झाले, सांगणाऱयाला पैसे मिळाले पण, त्यातून निर्माण होणारे दोष कोण पाहणार? सर्वसाधारणपणे प्रश्न विचारायला येणारे लोक आपल्या चुका कधीही सांगत नाहीत. शत्रुत्व त्या दोघात असते. त्याच्या शत्रुत्वात ज्योतिषी अथवा भटजी यांचा काहीही संबंध नसतो. त्याचा शत्रू काळा की गोरा, कोणत्या धर्माचा हे देखील माहीत नसते. पण उपाय सांगून तुम्ही त्याचे अनिष्ट करता किंवा त्याला त्रास व्हावा असे उपाय सुचवले जातात. त्यामुळे करावे तसे भरावे या नियमानुसार जे उपाय सांगतात, त्यांच्यावरच ते प्रकार उलटतात व व दशा-महादशा व अंतर्दशानुसार ज्यावेळी वाईट वेळ सुरू होते, त्यावेळी त्याचे फटके बसतात. संपूर्ण कुटुंबाला त्याचे फळ भोगावे लागते. त्यामुळे कुणालाही उपाय सांगताना प्रथम प्रश्न विचारण्याची बाजू योग्य आहे की नाही, त्याची काही चूक आहे का, हे प्रथम पाहावे. शिवाय त्याचां हेतू काय आहे, त्याचा जो कोणी शत्रू असेल त्याची बाजूही तपासून पहावी. कळत नकळत तुमच्या उपायाने एखाद्याचे वाईट झाले किंवा त्याला त्रास झाला तर निसर्ग नियमानुसार तुमच्यावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपत्ती कोसळते. त्याचे वाईट अनुभव येऊ लागतात. त्यामुळे कामाचे क्षेत्र कोणतेही राहू देत पण तुमच्या हातून कुणावरही चुकूनही अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्या. जोपर्यंत आपली वेळ चांगली असते तोपर्यंत सर्व काही चांगले असते, पण वेळ गेल्यावर कोणताही देव वाचवण्यास येत नाही. हस्ते परहस्ते लोकांचे वाईट करणाऱया अनेकांचे शेवटी काय हाल हाल झालेले आहेत, ते अनेकांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहेत. परमेश्वराने तुम्हाला जी विद्या दिलेली आहे, तिचां चांगल्यासाठी वापर करा. त्यात तुमचेच कल्याण होईल. आपल्यामुळे कोणाचे कोणतेही नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या. शांती असो पूजापाठ, मंत्र, अनुष्ठन हे सारे काही कल्याणासाठी असते. त्याचा दुरुपयोग चुकूनही होऊ नये अन्यथा तीच दैवी शक्ती अनिष्ट उपाय सुचविणाऱयाचे वाटोळे करते. पन्नास वर्षापूर्वी एक मांत्रिक अघोरी मार्गाने लोकांचे सतत वाईट करीत असे. त्यात त्याला खूप पैसे मिळायचे. पण त्याच्या अंतिम वेळेस अंगभर किळसवाणे किडयांनी त्याला ग्रासले. एक माणूसही जवळ फिरकला नाही. शेवटी हातगाडीवरून त्याला वैकुंठ धामात न्यावे लागले. कर्माचे फळ कधीही चुकत नाही.
मेष
या आठवडय़ातील महत्त्वाची ग्रहस्थिती: रवि-बुध भाग्यात व मंगळ तुमच्या राशीत हा योग अतिशय चांगला आहे. अत्यंत अवघड कामे हातावेगळी करू शकाल. आर्थिक समस्या मिटतील. लक्ष्मीयुगाचा काळ सुरू झालेला आहे. कष्ट, धाडस आणि चातुर्य यांचा संगम साधल्यास फार मोठे यश मिळेल. राशीस्वामी प्रबळ असल्याने असाध्य कामे देखील साध्य करू शकाल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. अचानक धनलाभ. अनेक संधी येतील. मानसिक समाधान मिळेल.
वृषभ
या आठवडय़ात रवि-बुध अष्टमात व मंगळ बाराव्या स्थानी, तोही हर्षलच्या युतीत, हा योग जरा त्रासदायक आहे. सर्व बाबतीत जपून राहा. स्फोटक पदार्थ, गॅस, पेट्रोल, वीज, अग्नी, विजेची उपकरणे जपून हाताळा. एखादी चूक देखील मोठे उत्पात घडवू शकते. कितीही जवळचे लोक असली तरी त्यांच्याबाबतीत जामीनकी अथवा तसा धोका चुकूनही करू नका. तसेच कुठेही सही करताना काळजी घ्या. बाकी इतर बाबतीत ग्रहमान उत्तम आहे. काळजी करू नये. देवाची आराधना चालू ठेवा.
मिथुन
सप्तमात रवि-बुध आणि लाभात मंगळ ही अत्यंत जमेची बाजू या आठवडय़ात आहे. सर्व कामात यश. मानसिक समाधान, कष्टाचे योग्य फल देणारी, तसेच सर्व कामात अनेकांचे सहकार्य मिळवून देणारी ही ग्रहस्थिती आहे. कुणाचंही मन न दुखवता गोड बोलून जर कामे करून घेतल्यास बरेच काही साध्य होईल. असा योग वारंवार येत नसतो. या योगाला शनिचे सहकार्य मिळेल. तसेच रवि, बुधाचे उत्तम सहाय्य, त्याचे श्रे÷त्व तुम्हाला प्राप्त होईल. पण कुठेही उतावीळपणा अथवा अतिपणा करण्यास जाऊ नका.
कर्क
सहाव्या स्थानी रवि-बुधाचे सहकार्य नोकरी-व्यवसाय व्यक्तीत उत्तम आहे. अनेक महत्त्वाच्या कठीणप्रसंगी तुमचे कौशल्य पणास लागेल व त्याचे सर्वजण कौतुक करतील. दशमातील मंगळ-हर्षल अचानक अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडवील. त्यादृष्टीने आगामी दीड महिना फार महत्त्वाचा ठरणार आहे. स्थलांतर, अपेक्षित ठिकाणी बदली, प्रचंड जबाबदारी, नव्या क्षेत्रात प्रवेश, विवाहाच्या वाटाघाटीना सुरुवात अशा बऱयाच गोष्टी या कालखंडात घडू शकतात. आर्थिक बाबतीतही हा योग चांगला आहे.
सिंह
पंचमात रवि-बुध योग हा श्रेष्ठ मानला जातो. शिक्षणातील, विवाहकार्यातील अडचणी दूर होणे, नोकरी-व्यवसायात प्रगती, प्रेमप्रकरणात यश, आध्यात्मिक क्षेत्रात जाणकारांचे सहकार्य, तसेच लक्ष्मीची कृपा लाभणे यादृष्टीने हा योग सर्वश्रे÷ मानला जातो, पण तुमच्या कुंडलीतील बाकीच्या ग्रहांची देखील साथ असावी लागते. चंद्र-मंगळाचा त्रिकोण योग सर्व बाबतीत मोठे यश देणारा आहे. न होणारी अनेक अवघड कामे होऊ शकतात, पण त्याबरोबर प्रभावी मंगळामुळे डोके दुखण्याचे प्रकारही निर्माण होतात. त्यासाठी काळजी घ्यावी. प्रवासात अपघात व अतिवेग यापासून काळजी घ्यावी लागेल.
कन्या
चतुर्थात रवि-गुरुचे सहकार्य, वास्तुविषयक कोणत्याही कामाला चांगले आहे. खानदानी घराण्याशी विवाह व तत्सम कामासाठी वाटाघाटी करण्याचा योग येईल. अष्टमातील हर्षल-मंगळ योग धोकादायक आहे. सर्व तऱहेच्या बनावट पदार्थांपासून दूर रहा. किरकोळ चुका देखील गंभीर स्वरूप धारण करू शकतात. पित्तप्रकोप वाढू शकतो. तसेच मारामाऱया, गोंधळ, राजकारण, दंगली अशा प्रकारात चुकूनही गुंतू नका. तुम्ही रस्त्याने सरळ जात असला तरी समोरून येणाऱयाची खात्री नसते.
तूळ
तृतीयात रवि-बुधाचे उत्तम सहकार्य, त्यामुळे कार्यक्षमतेला वाव मिळेल. कामाचा उरक चांगला होईल. नातेवाईक व शेजारीपाजारी चांगले वागू लागतील. तुमच्या कामाचा धडाका पाहून अनेकांना धडकी भरेल. काहीजण तुमच्या कामाची प्रशंसा करतील पण, त्यात त्यांचा नक्की हेतू काय आहे हे कळणे कठीण आहे. सप्तमातील मंगळ वैवाहिक जोडीदाराचे वर्चस्व वाढवण्याची शक्मयता आहे. एखाद वेळेस प्रचंड वादावादी होऊ शकते.
वृश्चिक
राशीस्वामी मंगळ सहाव्या स्थानी बलवान आहे. आरोग्याच्या तक्रारी वगळता इतर सर्व बाबतीत तो शुभदायक ठरेल. शत्रूची दाणादाण उडेल. तुमची बाजू कोणीही खोडू शकणार नाही. धनस्थानी रवि-बुध योग आर्थिक समस्या निर्माण करील. महत्त्वाची कामे सोडून इतर कामासाठी मोठा खर्च करावा लागेल. त्यामुळे चिडचिड होण्याची शक्मयता आहे. वाहन जपून चालवा. डोळय़ांची काळजी घ्या. कोण कसे व कोणत्या अर्थाने बोलत राहील याकडे बारीक लक्ष ठेवा. तुमच्या तोंडून
कळत-नकळत कोणाविषयी एखादा चुकीचा शब्द गेला तर त्याचे फार मोठे भांडवल कुणीतरी करण्याची शक्मयता दिसते.
धनु
तुमच्या राशीत असलेले रवि-बुध तुम्हाला अनेक कार्यात उत्तम यश देतील. कामाचा उरक वाढेल. कष्टाला योग्य न्याय मिळेल. आर्थिक गंगाजळीत भर पडेल. महत्त्वाच्या कामात तुमचा सल्ला अत्यंत मोलाची भूमिका बजावेल. इतरांना अत्यंत क्लिष्ट व अवघड वाटणारी कामे करून दाखवाल. चंद्र-मंगळाचा शुभयोग जिद्द वाढवील. ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ असे वाटू लागेल. कोणतेही काम अवघड वाटणार नाही. तुमच्याकडे जर कष्ट व चातुर्य आणि प्रसंगावधान असेल तर सध्याचे ग्रहमान तुम्हाला फार मोठे यश मिळवून देईल.
मकर
बाराव्या स्थानी रवि-बुध काही बाबतीत अडचणी निर्माण करणारा योग आहे, पण अडलेल्या कामाला मात्र गती देईल. आपले कोण, परके कोण हे याच काळात समजून येईल. नोकरी, व्यवसायासाठी कुणी काहीतरी मागण्याची शक्मयता आहे. प्रभावी मंगळाचे भ्रमण जागा, घरदार यांच्या व्यवहारास अनुकूल आहे. पण स्पष्टवक्तेपणा आणि पारदर्शक व्यवहार ठेवा, म्हणजे कुठेही नुकसान होणार नाही. शनि-गुरुचा शुभम योग जीवनाला स्थैर्य देईल. अस्थिरतेचे युग संपुष्टात येईल.
कुंभ
लाभस्थानी रवि-बुध हा लाभदायक योग आहे. ऐन अडचणीच्या वेळी कोणीतरी मदत करतील, पण काही मित्रांच्या बाबतीत सावध राहावे लागेल. त्यांची एखादी भानगड तुम्हाला संकटात लोटू शकते. सप्तमातील प्रभावी मंगळ जीवनात वादावादीचे प्रसंग निर्माण करेल, पण त्याचा तमाशा होऊ देऊ नका. आर्थिक बाबतीत ग्रहमान उत्तम आहे. नोकरी, धंदा, व्यवसाय, उद्योग व्यवस्थित चालेल. कोणत्याही बाबतीत अडचणी येणार नाहीत. शनि-गुरु योगामुळे विलंब मात्र होईल.
मीन
दशमस्थानी रवि-बुध योग उत्कृष्ट मानला जातो. नोकरीत पदोन्नती, पगारवाढ, आवडते क्षेत्र मिळणे, वरि÷ मंडळींची मर्जी राहणे, तुमचे अधिकार वाढणे यासह अनेक गोष्टी घडू शकतात, पण त्यासाठी तुमचे पूर्वीचे कष्टही आवश्यक आहेत. याकडे दुर्लक्ष करू नये. धनस्थानी प्रभावी मंगळ आहे. डोळय़ांची काळजी घ्या. खर्च वाढतील. मानसिक समाधान मिळणार नाही. पण कोणतेही महत्त्वाचे मोठे व्यवहार मात्र निश्चित यशस्वी होतील.