बुधवार दिनांक 5 ते मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट 2020
आता तर कोरोना टॉपवर, दुर्लक्ष करणे धोक्मयाचे!
गेल्या नोव्हेंबरपासून कोरोना या विषाणू व्हायरसने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. जगाचा असा कोणताही कोपरा नाही की, जो त्याने व्यापलेला नाही. सुरुवातीला दोन किंवा तीन पेशंट सापडल्यावर संपूर्ण भाग किंवा गाव बंद करण्यात येत होते पण, हल्ली त्याचा उदेक होऊनही लोक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. याला बरीच कारणे असू शकतात. काहीवेळा एखाद्या गोष्टीच्या ‘पराचा कावळा’ केल्यामुळे लोक त्याकडे लक्ष देत नाहीत. साधासुधा रोग असेल तरीही कोरोना म्हणून भीती घालून किरकोळ व्याधींना गंभीर आजाराचे स्वरूप दिले जात आहे. साध्यासुध्या गोळय़ा देखील मिळणे दुरापास्त झालेले आहे. अजून कोणतेही औषध, लस अथवा इंजेक्शन निघालेले नाही. तरीसुद्धा रुग्ण बरे होत आहेतच. त्यामुळे या मागील इंगित काय? अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. दिवा विझण्यापूर्वी मोठा होतो, त्या न्यायाने सध्या कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. राहू-केतू बदलेपर्यंत म्हणजे 19 सप्टेंबर पर्यंत काळजी घ्या, त्यानंतर या रोगाचा प्रभाव आपोआप कमी होत जाईल.प्रत्येक गल्लीत, गावागावात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे यापुढील काळ अत्यंत भयानक असणार आहे. ‘श्रीरामरक्षा स्तोत्र’ हे प्रसिद्ध स्तोत्र आहे. सूक्ष्म जीवजंतू, डोळय़ाना न दिसणारी महामारी यापासून सर्व शरीराचे रक्षण होईल, असा त्यात उल्लेख आहे. त्याचे वाचन केल्यास या महामारीपासून बचाव होऊ शकतो. अर्थात इथे श्रद्धा अपेक्षित आहे. नुसते वाचून काय होणार? असे म्हणणारे बरेच जण भेटतील, पण अनुभव घ्यायला काय हरकत आहे? या रोगावर औषध येईल तेव्हा येईल पण, तोपर्यंत आपण स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. दुर्गासप्तशतीमध्ये इथं ‘यदा यदा बा धा’ तसेच ‘जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी’ असे दोन मंत्र अत्यंत प्रभावी आहेत. ज्यांना शक्मय असेल त्यांनी या दोन मंत्रांचा सतत जप करीत रहावे. हे दोन्ही मंत्र जाणकाराकडून लिहून घ्यावेत व योग्य उच्चार करून ते म्हणावेत. इलेक्ट्रॉनिक बल्बचा शोध लावलेल्या एडिसनला एकाने विचारले, तुझ्या हातात बायबल आहे मग अशा निरर्थक गोष्टींच्या मागे तू का लागतोस? त्यावेळी एडिसनने त्याला एक डोंगर, समुद्र व ज्वालामुखीचे उदाहरण दिल.s जेथे निर्मिती आहे, तेथे निर्माता असणारच. आपल्याला परमेश्वर दिसत नाही म्हणजे, तो नाही असे म्हणता येत नाही. या तत्त्वाने पाहू गेल्यास जसा कोरोना निर्माण झाला, तसेच त्यावर उपायही निश्चितच सापडेल.
मेष –
दशमातील शनिमुळे नोकरी, स्वतःचा व्यवसाय, अधिकारपद मिळण्याची शक्मयता आहे. कर्तृत्वाला प्रति÷ा प्राप्त होईल. शत्रूंचे भय राहणार नाही. परदेशी जाण्याची इच्छा असेल तर यशस्वी व्हाल. आर्थिक अडचणी वाढणार नाहीत पण, व्यसन व इतर तत्सम अनिष्ट गोष्टींपासून मात्र दूर राहावे लागेल. रवि-शनिचा प्रति योग, कौटुंबिक जीवनात किरकोळ धुसफूस, थोरामोठय़ांची वाद-विवाद निर्माण करील. शक्मयतो कुणाचेही मन दुखवायला जाऊ नका.
वृषभ –
भाग्यस्थानामुळे आर्थिक अडचणीतून सुटका होईल. हातून चांगली कामे होऊ लागतील. भाग्योदयाच्यादृष्टीने उत्तम योग. रवि-शनिच्या प्रतियोग मानसिक संभ्रम निर्माण करील. किरकोळ कारणावरून शेजारी व नातेवाईक खुसपट काढण्याची शक्मयता आहे. त्यातून गैरसमजही निर्माण होतील. शक्मयतो कुणाच्या भानगडीत पडू नका. शुक्र-राहु योग इतर मार्गाने धनलाभ घडवतील.
मिथुन –
अष्टमात शनि, त्याच्याशी रविचा प्रतियोग, आरोग्याच्या दृष्टीने चांगला नाही. सांसर्गिक आजारापासून जपा. आर्थिक व्यवहारात सावध राहावे लागेल. काहीवेळा कोणालातरी वाचवायला जाऊन, नको ते आरोप देखील होऊ शकतात. पण इतर बाबतीत ग्रहमान अनुकूल आहे. कॉलमॅटर व तत्सम प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करा मानहानी पासून जपा.
कर्क –
आपण चांगले असलो तरी, समोरचा माणूस तसा असेलच याची खात्री नसते. त्यामुळे नको तेथे चांगुलपणा अथवा औदार्य दाखवू नका. कुणीही त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. शुक्र-राहुचे भ्रमण खर्च वाढवणारे आहे. रवि-शनिचा प्रतियोग आरोग्याच्या बाबतीत चांगला नाही. सांसर्गिक विकारापासून काळजी घ्या. या आठवडय़ात कुणालाही अमुक-करीन तमुक करीन असे सांगू नका.
सिंह –
रवि-शनिचा प्रतियोग, निष्कारण तेढ निर्माण करील. यासाठी वादावादी, मतभेद, भांडण यापासून चार हात दूर राहा. आर्थिक अडचण पडणार नसली तरीसुद्धा अचानक मोठे खर्चही निघू शकतील. त्यासाठी कोणालाही उधार उसनवार, कर्ज वगैरे देताना काळजी घ्या. पैसे अडकण्याची शक्मयता आहे. विवाहासाठी प्रयत्न करीत असाल तर, नक्की यश मिळेल. पण बोलण्यात माधुर्य ठेवा.
कन्या –
रवि-शनि प्रतियोगामुळे संतती आणि मित्रमंडळीबरोबर कडाक्मयाचे वादविवाद होऊ शकतात. एखाद्या कामासाठी ठेवलेला पैसा दुसऱयाच कारणासाठी खर्च होईल. आर्थिक अडचण पडणार नसली तरीसुद्धा अचानक काही मोठे खर्चही उद्भवतील. ऑनलाईन खरेदी-विक्रीच्यावेळी काहीतरी घोटाळा होईल. सावध राहणे आवश्यक.
तूळ –
शनि-रविच्या प्रतियोग नोकरी व्यवसाय आणि कौटुंबिक स्वास्थ्य याबाबतीत जरा अडचणी निर्माण करण्याची शक्मयता आहे. कोणताही प्रसंग आला तरी नोकरी सोडण्याचा विचार करू नका. तसेच सामंजस्याने कौटुंबिक मतभेद मिटविण्याचा प्रयत्न करा. वाहन दुर्घटनेची शक्मयता आहे. विशेष काळजी घ्यावी लागेल. आर्थिक अडचण जाणवणार नाही, पण नियोजन व्यवस्थित ठेवा.
वृश्चिक –
काही वेळा एकाच वेळी परस्पर विरोधी कामे करण्याची परिस्थिती येते. अशावेळी मन शांत ठेवून निर्णय घेतल्यास कोणताही गोंधळ होत नाही, हे लक्षात ठेवून कामे करा. रवि-शनिच्या प्रतियोगाने काही संबंध बिघडण्याची शक्मयता आहे. पण नोकरी व्यवसायात मात्र मोठे यश मिळेल. वाहन वगैरे जर कोणी मागितले तर, शक्मयतो देऊ नका. त्यांच्या चुका तुम्हाला भोगाव्या लागतील.
धनु –
धनु अष्टम व धनस्थानातून होणारा रवि-शनिचा प्रतियोगाने आर्थिक गणित चुकण्याची शक्मयता आहे. त्यामुळे आवश्यक तेवढाच खर्च करा. कुणासाठी काही करताना आपला पाय खड्डय़ात जाणार नाही, याची काळजी घ्या. विवाहकार्य, प्रवास, मोठी खरेदी-विक्री, जमिनीचे व्यवहार मात्र यशस्वी होतील. अतिताण असलेली कामे शक्मयतो स्वीकारू नका.
मकर –
राशीस्वामी शनि आणि रविचा प्रतियोग आरोग्याच्या बाबतीत चांगला नाही. किरकोळ आजाराकडे दुर्लक्ष करू नका. कितीही गंभीर प्रसंग आले तरी रागावर नियंत्रण ठेवून कामे करावी लागतील. तुमच्या मनात काय आहे, याचा थांगपत्ता कोणालाही लागू देऊ नका. नोकरी-व्यवसायात एखादे महत्त्वाची कामे करण्याचा प्रसंग येईल. त्याने तुमचे जीवन बदलून जाईल.
कुंभ –
अकराव्या गुरुची कृपा आहे, तोपर्यंत कोणतेही महत्त्वाचे काम करून घ्या. खरेदी-विक्री, वाटाघाटी, कर्जफेड, नोकरीत उच्चपद या दृष्टीने ग्रहमान अनुकूल आहे. पण रवि-शनिचा प्रतियोग शत्रुपीडा आणि आरोग्य याबाबतीत त्रासदायक ठरेल. त्यासाठी आपण बरे आपले काम बरे, ही वृत्ती ठेवून बघा. तुमच्या केसालाही कोणी धक्का लावू शकणार नाहीत. नव्या ठिकाणी प्रवास होतील.
मीन –
काहीवेळा वाईटातूनही चांगले निघते, याचा अनुभव या सप्ताहात येईल. एखादा कट्टर शत्रू मित्र होऊ शकतो, हरवलेली अथवा कुणाला दिलेली रक्कम परत मिळू शकते, नोकरीच्या प्रयत्नात असाल तर अपेक्षेपेक्षा चांगले पद मिळेल. राजकारणाशी संबंध असेल तर सावध रहा. गुप्तशत्रूंची कुरापत तुम्हाला धोकादायक ठरू शकते. जुनी मशिनरी अथवा लोखंडी वस्तूमुळे इजा होण्याची शक्मयता.