राशींचा देश टॅरोचा संदेश
5 डिसेंबर 2021
मेष
हा आठवडा कौटुंबिक संबंधांना समृद्ध करणारा आहे. नवीन जबाबदाऱया स्वीकाराल. काही नात्यांमध्ये ताण येईल. पण नाती तुटू देऊ नका. अति कामामुळे थकवा येईल. टॅरोचा संदेश आहे की आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. प्रेमीजनांना असे वाटेल की नात्याला नाव देणे गरजेचे आहे. नात्याला भविष्य असणे गरजेचे आहे. पण काही गोष्टींना वेळ लागतो हे ध्यानात घ्या. पैशाच्या बाबतीत सल्ला घ्यायला कचरु नका. करियरमध्ये सध्या बदल नको.
वृषभ
कुटुंबातील व्यक्तीशी भांडण होईल, पण नंतर समझोताही होईल. आपल्या वागण्याने कुणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. दुखणे अंगावर काढणे, या आठवडय़ात महागात पडू शकते. रोग बळावणार नाही याची काळजी घ्या. प्रेमीजनांना हा आठवडा आनंदाचा जाणार आहे. जोडीदाराचा सल्ला बहुमोल ठरेल. पैशाच्या बाबतीत टॅरोचा संदेश आहे की काही तडजोडी होऊन एखादे भांडण मिटेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱयांचे सहाय्य घ्यावे लागेल.
मिथुन
तुमच्या आणि तुमच्या कुटुंबीयांच्या विचारामध्ये विरोधाभास असू शकतो. पण भांडण होऊ देऊ नका. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा उत्तम आहे. तुम्ही तुमची इच्छाशक्ती आणि उत्साहाने इतरांना प्रेरीत कराल. पैशाच्या बाबतीत हा आठवडा अगदी उत्तम आहे. आवक वाढेल प्रेमीजनांना मात्र या आठवडय़ात गैरसमज आणि भांडणाचा सामना करावा लागेल ऑफिसच्या ठिकाणी गटबाजीला सामोरे जाल. टॅरोचा संदेश आहे की गुप्तशत्रूंच्या कारवाया वाढत आहेत, सांभाळा.
कर्क
कुटुंबामध्ये एखाद्या विषयावर चर्चा होतील. पूर्वी तुम्ही केलेल्या एखाद्या कृत्यामुळे अपराधी वाटू शकते. तुम्हाला मानसिक शांतीची गरज आहे. मानसिक चिंतेमुळे थकवा येऊ शकतो. तुम्हाला सुस्ती आल्यासारखे जाणवेल. प्रेमीजनांना अधीर होऊन चालणार नाही. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. पैशाच्या बाबतीत तुम्ही थोडे नाखूष असाल. दिलेले कर्ज मिळेल. पण व्याज मिळणार नाही. करियरमध्ये संकल्पपूर्वक सकारात्मक बदल कराल.
सिंह
कौटुंबिक बाबतीत तणावाचा आठवडा आहे. पण असे असणे हेही काही वेगळे नाही. तब्येतीच्या जुन्या तक्रारी डोके वर काढू शकतात. मानसिक ताणाचाही तब्येतीवर परिणाम होईल. प्रेमसंबंधात एका हाताने टाळी वाजत नाही हे लक्षात घ्या. जोडीदाराने तुमच्या मनाप्रमाणेच वागले पाहिजे हा हट्ट सोडा. या आठवडय़ात पैशाची तंगी वाटू शकते. करियरमध्ये निर्णय घेताना सल्ला जरुर घ्या.
कन्या
तुम्ही तुमच्या कुटुंबीयांकडून अपेक्षा वेगळी करता आणि ते करतात वेगळेच. हा आठवडा त्यांच्यावर जोर जबरदस्ती करू नका. तब्येतीच्या छोटय़ा मोठय़ा तक्रारी असतील पण सहज दूरही होतील. पैशाच्या बाबतीत पूर्वी घेतलेले निर्णय योग्य ठरतील. हा आठवडा व्यर्थ खर्च करू नका. करियरच्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे. नवीन नोकरीची संधी मिळेल.
तुळ
कुटुंबीयांमध्ये विसंवाद होऊ नये यासाठी प्रयत्न करताना तुम्हालाच एकटेपणा जाणवू शकतो. पण त्यांना तुमची गरज आहे हे ध्यानात घ्या. स्वास्थ्यासंबंधी तक्रारी होऊ शकतात. पण त्याचा ताण घेण्यात काहीच हंशील नाही. प्रेमीजनांचे प्रेमसंबंध आणखी प्रगल्भ होतील. खर्चाचा मोह टाळा पैसे गुंतवण्याकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी मन लागणार नाही. योजना आखून काम करा.
वृश्चिक
नातेवाईकांच्या समारंभात सामील व्हाल. नात्यांमध्ये उष्मा असेल. वादविवादापासून दूर रहा. या आठवडय़ात असे वाटेल की स्वतःकरता, स्वतःच्या तब्येतीकरता काहीतरी करावे. या आठवडय़ात तुम्ही स्वतःला ताजेतवाने आणि ऊर्जावान ठेवाल. प्रेमीजनांना हा आठवडा म्हणजे शानदार भेट आहे. त्यांना तो आनंदात आणि उत्साहात जाईल. पैशाच्या बाबतीत मात्र संतुलन राखणे गरजेचे आहे. करियर किंवा कामाच्या निमित्ताने प्रवासाचा योग.
धनु
कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या बाबतीत चिंता वाढेल. कौटुंबिक वादाचे रूपांतर गंभीर घटनेत होऊ शकते. याकरता वाद टाळा. स्वास्थ्याचा पाया जरी ठीक असला तरी या आठवडय़ात दुर्घटनेपासून सावध रहा. वाहन चालवताना सतर्क राहणे आवश्यक. पैशांच्याबाबतीत एखादी व्यक्ती दिलेला शब्द पाळणार नाही. करियरच्या बाबतीत मात्र हा आठवडा उत्तम आहे.
मकर
कामाच्या ठिकाणी असलेला ताणतणाव कुटुंबीयांमुळे दूर होईल. टॅरोचा संदेश आहे की या आठवडय़ात तुम्हाला सुखाचा आणि दुःखाचा दोन्हीचा अनुभव येईल. एखादी जखम किंवा व्याधी ठीक होईल. पण चुकीच्या सल्ल्यापासून सावध रहा. प्रेमी जनांना वाटेल की तुमचा जोडीदार तुम्हाला टाळत आहे. अशा वेळी गप्प न राहता जाब विचारा. पैशांच्या बाबतीत चिंता नको. आवक वाढेल. कामाच्या ठिकाणी संयमाची गरज.
कुंभ
कुटुंबातील सुसंवाद कुठे तरी कमी होत आहे, तो सांभाळा. घरातील वृद्ध व्यक्तीला समजावण्यात राग येऊ देऊ नका. मानसिक ताणामुळे तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. अति विचार करणे टाळा. निरोगी राहण्यासाठी एखादी चांगली सवय लावावी लागेल. पैसे वाचवण्यातच शहाणपणा आहे हे समजेल. तेच पैसे पुढे कामाला येतील. कामाच्या ठिकाणी टीमवर्कचे महत्त्व इतरांना सांगाल पण उपयोग होणार नाही.
मीन
घरचे तुम्हाला समजून घेत नाहीत असे तुम्हाला वाटू शकते. तुटक बोलण्याचा त्रास होईल. पण वैतागून नाही चालणार. स्वास्थ्याच्या बाबतीत टाळाटाळ करून नाही चालणार. एखादी साधी बाब पुढे गंभीर रूप घेऊ शकते. पैशाला कमी नाही पडणार पण खर्च किती आणि कुठे करावा याचा विचार तुम्हाला करावा लागेल. प्रेमींनी संवाद आणि भांडण यातला फरक समजून घेतला पाहिजे. कामाच्या ठिकाणी राजकारणापासून दूर रहा.