27-8-2023 ते 2.9.23
मेष
आपल्या बोलण्यावर आणि शब्दांवर कंट्रोल ठेवणे अत्यंत गरजेचे असेल. वाहनाचा लाभ. द्रव्य लाभ. पद, प्रतिष्ठा वाढेल. दूरच्या प्रवासावर ती खर्च होईल. वैवाहिक जोडीदाराला त्रास संभवतो. आपल्याच माणसांकडून कमी जास्त प्रमाणामध्ये अपमान सहन करावा लागू शकतो. सगळ्या बाबतीमध्ये गुप्तता पाळा.
तुळशीची पाने जवळ ठेवावी
वृषभ
श्र्रम अधिक आणि फायदा कमी अशी परिस्थिती येऊ शकते. कामात बदल होईल. नोकरीत बढतीची शक्मयता असेल. तुमच्याकडून दुर्वर्तन होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. मित्रांचा आणि मोठ्या माणसांचा सहवास मिळेल. धनवृद्धी होईल पण खर्चावर नियंत्रण ठेवा.
कुलदेवीची सेवा करा
मिथुन
कामाचा दर्जा कमी कमी होऊ नये म्हणून इतरांची मदत घ्यावी लागली तर जरूर घ्यावी. नोकरीत वरिष्ठांची मर्जी असेल. शत्रू मान सन्मानाला ठेच पोहोचवू शकतात. प्रवासात त्रास संभवतो. अशक्तपणा आणि रोग होऊ शकतात. वडिलांकडून विरोध होईल. धार्मिक बाबतीत अडचण येईल.
धर्माप्रमाणे वर्तन असू द्या
कर्क
शारीरिक व्याधीमध्ये ज्वर किंवा ताप त्रास देईल. एखाद्या वादात अडकण्याची शक्मयता आहे. अपघातापासून वाचावे लागेल. प्रेमसंबंधात मधुरता येईल. अविवाहितांचे विवाह जुळतील. नोकरीमध्ये प्रगती होऊ शकते. कीर्ती प्रतिष्ठेची प्राप्ती होईल. तीर्थयात्रा घडेल. पुण्यसंचय होईल.
मिठाई दान द्यावी
सिंह
आपल्या कामाकडे लक्ष ठेवावे. इतरांच्या भानगडीत न पडलेले बरे. वैवाहिक जीवनात थोडा ताण तणाव येऊ शकतो आणि याचे कारण पार्टनरचा दुराग्रह असू शकतो. क्षुल्लक रोग मोठा होण्याची शक्मयता आहे. अचानक धनप्राप्तीचे योग. भागीदारीमध्ये भांडणे होऊ शकतात.
दिव्यांग व्यक्तीला फळे द्यावीत.
कन्या
हवामानातील बदलाचा खास असा परिणाम तुमच्यावर झाला नसला तरी संक्रमित होणाऱ्या रोगांपासून बचाव करणे गरजेचे असेल. आर्थिक लाभ होईल. सोने नाणे खरेदी कराल. तुमच्याबाबतीत अफवा पसरवण्यात येऊ शकतात. तुमच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांकडे लक्ष ठेवणे गरजेचे असेल.
अन्न दान करावे
तूळ
मोठा प्रोजेक्ट किंवा संधी मिळण्यापेक्षा आत्ता हातात असलेल्या कामांकडे लक्ष देणे जास्त गरजेचे आहे. चालढकल केल्यामुळे हातातल्या संधी दुसऱ्याच्या पदरी पडू शकतात. शत्रुपीडा संभवते. शिक्षणात जास्त कष्ट घ्यावे लागतील. घरातील कामांच्या बाबतीत जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडू शकतो.
जलचरांना खाणे घालावे
वृश्चिक
पोटाचे विकार संभवतात. या तक्रारीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, अगदी मामुली वाटणाऱ्या काही पोटाच्या तक्रारी उग्ररूप धारण करू नयेत याकरता संयमाची आणि पथ्याची गरज आहे. मित्रांकडून फसवणूक होऊ शकते. मित्रांची भेट होईल. डोके शांत ठेवून निर्णय घ्या.
लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवावा
धनु
अधिकारात वाढ होईल. प्रमोशनची शक्मयता असेल. चांगली बातमी कळेल. वाहन सौख्य उत्तम असेल. गुप्त शत्रूमध्ये वाढ होईल. प्रवासात धोका संभवतो. महत्त्वाची कामे होतील पण उशीर लागेल. स्पर्धेत यश मिळेल. व्यावसायिकांनी स्पर्धेमध्ये टिकण्याकरता नवीन संधी शोधाव्या.
छत्री दान द्यावी
मकर
कौटुंबिक खर्च वाढेल. विरोधक शांत होतील. नको तिथे पैशाची हानी संभवते. रक्तदोष येऊ नये याची काळजी घ्यावी .जास्त उदारता दाखवू नये. देण्या घेण्यात नुकसान संभवते. छोट्या-मोठ्या जखमा होऊ शकतात. कुटुंबातील कलह वाढू नयेत असे पहावे.
मानसन्मानाची प्राप्ती होईल.
कुंभ
पैशाची आवक वाढेल. कौटुंबिक विवादामध्ये तिसऱ्या माणसाला मधे बोलू देऊ नका. कामे मनासारखी पूर्ण होतील. कर्जापासून मुक्तता मिळेल. मनमानी करू नये. वाहन चालवताना सावध असावे. विरोधक त्रास देतील. नोकरीत वरिष्ठांचा त्रास किंवा रोष संभवतो. एकटेपणा वाटेल.
तामसिक पदार्थ खाणे टाळावे.
मीन
इतर सगळ्या गोष्टींपेक्षा स्वत:च्या तब्येतीकडे जास्त लक्ष द्यावे. शत्रू कारस्थाने रचतील. छोटी संकटे येऊ शकतात .विषयभोगाकडे मनाचा कल असेल. द्रव्य लाभ वाढेल. छान छौकी करता पैसा खर्च होईल. भांडणे संभवतात. समाजातला दर्जा वाढेल. परगावी प्रस्थान होऊ शकते.
हळदीचा टिळा लावावा
जर एखादी व्यक्ती अचानकपणे विचित्र वागायला लागली, भान नाहीसे व्हायला लागले, किंवा आपण काय करतोय हे त्या व्यक्तीला कळेनासे झाले तर (वैद्यकीय उपायाबरोबरच) केळीच्या पानावर पापडी, शेव, फरसाण, 5 तळलेले बेसनाचे पदार्थ घेऊन त्यावर थोडे दही टाकावे. लिंबू पिळावा. खोबरेल तेलाची, तिळाच्या तेलाची आणि गोड्या तेलाची अशा तीन वाती त्यावर ठेवून पेटवाव्यात आणि या सगळ्या वस्तू अशा व्यक्तीवरून उतरवून बाहेरील कचराकुंडीत टाकाव्या.