नवी दिल्ली/प्रतिनिधी
राष्ट्रपती भवन सामान्य जनतेसाठी येत्या शनिवारपासून म्हणजे दिनांक ६ फेब्रुवारी पासून पुन्हा खुले होणार आहे. कोविड-१९ मुळे १३ मार्च २०२० पासून बंद करण्यात आले होते. शनिवार आणि रविवारी (सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस सोडून) ते खुले रहाणार आहे. अभ्यागतांना https://presidentofindia.nic.in किंवा https://rashtrapatisachivalaya.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन आँनलाईन पध्दतीने आपल्या भेटीची आगाऊ नोंदणी करता येईल. पूर्वीप्रमाणेच ५० रुपये जुजबी फी यासाठी आकारली जाईल.
शारिरीक अंतराच्या निकषानुसार १०:३०,१२:३०,४:३० यावेळेत आगाऊ नोंदणी करत येईल. जास्तीत जास्त २५ जणांना एका निर्धारित वेळी प्रवेश दिला जाईल . भेटीदरम्यान अभ्यागतांना मास्क घालणे, शारिरीक अंतर पाळणे या कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल.