सावंतवाडी /प्रतिनिधी-
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट, राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल, सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे माडखोल धवडकी विलवडे येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या आरोग्य मेळाव्यात १६२ रुग्णांना तपासणी करून आरोग्य सेवा देण्यात आली.
राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, डॉ.आकाश घाडी, डॉ. सई लिंगवत, डॉ. रक्षंदा घाडी, डॉ.सम्रुद्धी देसाई यांनी आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन केले. यावेळी माजी राज्यमंत्री प्रविणभाई भोसले, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष इक्तीहार राजगुरू, युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजु धारपकर, उपाध्यक्ष संतोष जोईल, सरपंच बाळा शिरसाट,माजी सरपंच सुर्यकांत राऊळ, मा.सरपंच संजय लाड, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती जँकी डिसोझा, बेंजो विकास मंडळाचे लखन आडेलकर, सामाजिक कार्यकर्ते व मुख्य आयोजक रवी राऊळ,नरेंद्र राऊळ, आनंद राऊळ, गुरुनाथ राऊळ उपस्थित होते.