पणजी : तेलंगणा राज्यात होणाऱया 47 व्या राष्ट्रीय ज्युनियर कबड्डी स्पर्धेत भाग घेणारे गोव्याचे पुरुष व महिला संघ वास्को रेल्वेमार्गे रवाना झाले.
गोवा कबड्डी असोसिएशनने राष्ट्रीय ज्युनियर कबड्डी स्पर्धेत भाग घेण्यासाठी सांखळी येथील ज्युनियर कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतून पुरुष व महिला खेळाडूंची निवड केली होती. तद्नंतर आल्तिनो येथे काही दिवस कबड्डी मॅटवर दोन्ही संघ खेळाडूंसाठी सराव शिबिर आयोजित करून त्यात पुरुष व महिला मिळून खालील 24 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. राहुल विरेश नागावत याची पुरुष संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. या संघातील इतर खेळाडू अली अहमद सय्यद गौवंडी, आकाश उपेंद्रा सिंग, लक्ष्मण गावडा, योगेश नरेंदर, चेतन नारायण कोनशीकर, धुवीक विजय गोहेल, दीप संजयकुमार, विजय ओमप्रकाश, नवीन जगता, कुलविंदर रखुबीर दलाल व आशीष वझीर. शदर संघाबरोबर प्रशांत मोकुळ (प्रशिक्षक), लक्ष्मण खर्डे (व्यवस्थापक) व भूषण वेळीप (संघ अधिकारी).
महिला संघाच्या कर्णधारपदी यशमिता शैलेश तलवडकर हिची निवड झाली. या संघातील इतर खेळाडू पुढीलप्रमाणे ः रिद्धी रोहिदास प्रियोळकर, मिनू सतबीर, शिवानी कुलदीप सिंग, निकिता शिवा म्हापसेकर, पंचमी मारुती भट, वृतिका रंगनाथ मळीक, शिया सुदेश शेट, क्रितिका रामानंद शर्मा, कीर्ती सुरेश, निशू आनंद स्वरुप व अंशू सतपाल देवी. या संघाबरोबर शबाना शेख (व्यवस्थापक), ओमकार गांवस (प्रशिक्षक) व सज्जला पोडवालकर रवाना झाले. सदर कबड्डी स्पर्धा 22 मार्च ते 25 मार्चपर्यंत एस. पी. ऑफीस मैदान सुर्यापेट-तेलंगणा येथील मैदानावर होणार आहे.