बेळगाव : बेळ्ळारी येथे झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग निवड चाचणीत बेळगावचे दोन बॉक्सर निशान कदम, नागेश पाटील यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रथमच निवड झाली आहे.
बेळ्ळारी येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणीत संपूर्ण कर्नाटकांतून 75 हून अधिक बॉक्सर्सनी भाग घेतला होता. त्यात 46 ते 48 किलो वजन गटात निशांत कदम व 92 किलोवरील वजन गटात नागेश पाटील यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. निवड समितीने त्याची दखल घेत या दोघांची 15 ते 21 सप्टेंबर दरम्यान जेएसडब्लु विद्यानगर टाऊनशिप येथे होणाऱया राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड केली. बेळगावच्या बॉक्सर्सची पहिल्यांदाच राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या दोघांना अर्जुन पुरस्कार विजेते कॅप्टन मुकुंद किल्लेकर व गजानन त्रिपाठी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.