चंद्रभागा दूध संस्थेची सभा खेळीमेळीत
प्रतिनिधी / कोल्हापूर
माजगाव (ता. पन्हाळा) येथील चंद्रभागा महिला दूध संस्थेची वार्षिक सभा खेळमेळीत पार पडली. सभेत जास्त दूध पुरवठा करणाऱया उत्पादकांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी शकुंतला आनंदराव माने होत्या. यावेळी राजस्थान येथे झालेल्या राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेत रौप्यपदक मिळवलेबद्दल संदिप कृष्णात चौगले यांचा सत्कार करण्यात आला.
चेअरमन मंदाकिनी माने यांनी अहवाल वाचन केले. सभेस आक्काताई चौगले. शोभा पाटील, उषाताई चौगले, शोभा पाटील, मंगल साळवी, शोभा माने, रत्नाबाई मगदूम, रत्नमाला माने, गावकामगार पोलीस पाटील, महादेव साळवी, सर्जेराव पाटील, बी. जी. पाटील, मधुकर कांबळे, शिवाजी गुरव आदी उपस्थित होते.