बेळगाव : बेळगावच्या आर. डी. फुटबॉल क्लबचा फुटबॉलपटु राहुल के मगदुम याची बेंगळूर येथे होणाऱया सुपर डीव्हीजन फुटबॉल स्पर्धेसाठी बेंगळूरच्या प्रोफेशनल क्लब कोडगू एफसी संघात निवड झाली आहे.
आर. डी. फुटबॉल क्लबचा फुटबॉलपटू राहुल मगदुमने बेंगळूर सुपर डिव्हीजन स्पर्धेसाठी कोडगु एफसी संघात स्थान मिळविण्यासाठी निवड चाचणीत सहभाग घेतला होता. त्याने दाखविलेल्या उत्तम खेळाची दखल घेऊन कोडगू एफसी संघाने राहुलला आपल्या संघात स्थान मिळवून दिले आहे. राहुलच्या या यशात बेळगावचे ज्ये÷ फुटबॉल प्रशिक्षक ऍग्नेल रेगो व आरडी फुटबॉल क्लबचे संचालक राहुल देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. वीरेश व मानस यांचे प्रोत्साहन लाभले आहे.