दापोली / प्रतिनिधी :
देशाची राजधानी दिल्ली येथे कथितरित्या बलात्कार झालेल्या 9 वर्षांच्या दलित मुलीची ओळख ट्वीटरवर फोटो टाकून उघड केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात एफआयआर नोंदविण्याच्या याचिकेवर 27 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दापोली भाजपा तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांनी याबाबत दिल्ली उच्च न्यायलयात धाव घेतली होती.
पीडितेच्या आई -वडिलांसोबत ट्विटरवर छायाचित्र प्रकाशित केल्या प्रकरणी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली होती.