रिओ डे जेनेरिओ
ब्राझीलमध्ये रविवारी झालेल्या एटीपी 500 पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या 18 वर्षीय कार्लोस अल्काराझने एकेरीचे जेतेपद पटकाविले. एटीपी टूरवर एकेरीचे जेतेपद मिळविणारा अल्काराझ हा सर्वात तरूण टेनिसपटू बनला आहे.
रविवारी झालेल्या या स्पर्धेतील एकेरीच्या अंतिम सामन्यात सातव्या मानांकित अल्काराझने अर्जेंटिनाच्या श्वार्त्झमनचा 6-4, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. हा अंतिम सामना 90 मिनिटे चालला होता.
ब्रिटनचा कॅमेरॉन नुरी अजिंक्य