सांगवे येथे अपघात : हरकुळ बु. सुतारवाडीवर शोककळा : रिक्षा चालकासह चौघे जखमी
कणकवली:
कणकवलीहून कनेडीच्या दिशेने जात असलेल्या रिक्षाला समोरून येत असलेल्या दुचाकीची धडक बसली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, दुचाकीवरील अमित प्रभाकर मेस्त्राr (40) व परशुराम अनंत पांचाळ (48, दोघेही रा. हरकुळ बुद्रुक – सुतारवाडी) हे जागीच ठार झाले. रस्त्यावर अक्षरश: रक्ताचा सडा पडला होता. अपघातात रिक्षामधील महिलेसह चौघेजण जखमी झाले. हा अपघात कणकवली- कनेडी राज्य मार्गावरील सांगवे-केळीचीवाडी येथे शुक्रवारी दुपारी 1 च्या सुमारास झाला.
अपघातात रिक्षामधील माधुरी मनोहर घाडीगावकर (47), बाळकृष्ण सदाशिव घाडीगावकर (80), मनोहर बाळकृष्ण घाडीगावकर (42) व रिक्षाचालक गणेश अशोक घाडी (30, सर्व रा. हरकुळ बुद्रुक) हे चारजण जखमी झाले. यातील माधुरी, बाळकृष्ण, मनोहर यांच्यावर खासगी रुग्णालयात, तर गणेश याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
समोरासमोर धडक
अमित मेस्त्राr व परशुराम पांचाळ हे दोघेजण हरकुळ येथून दुचाकीने (एमएच 07 एन 4390) कनेडी येथे बाजारहाट व अन्य कामांसाठी गेले होते. तेथून ते हरकुळ बुद्रुकला परतत होते. रिक्षामधील प्रवासी कनेडीच्या दिशेने जात होते. सांगवे-केळीचीवाडी येथे रस्त्याच्या उजव्या बाजूला आलेल्या दुचाकीची समोरून येणाऱया रिक्षाच्या (एमएच 07 एस 6898) पुढील उजव्या बाजूला धडक बसली. ही धडक एवढी तीव्र होती की, दुचाकी रिक्षाला धडकताच दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. दोघेही दुचाकीपासून दूर फरफटत जाऊन परस्परांपासून साधारण दहा फुटांवर विसावले. तर दुचाकी रिक्षाच्या मागील उजव्या चाकानजीक विसावली.
जखमी रुग्णालयात दाखल
अपघातात अमित मेस्त्राr व परशुराम पांचाळ यांच्या डोकीला, शरीराला गंभीर दुखापती झाल्या. रिक्षामधील प्रवासीही आतमध्ये विव्हळत पडले होते. अपघात घडल्याचे समजल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अमित व परशुराम हे दोघेही जागीच मृत झाल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी संपर्क केल्यानंतर येथे दाखल रुग्णवाहिकेने रिक्षामधील जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनास्थळी रक्ताचा सडा
अपघातात जागीच मृत्युमुखी पडलेले अमित मेस्त्राr व परशुराम पांचाळ यांच्या शरीरातून मोठय़ा प्रमाणात रक्त वाहत होते. रक्ताचे ओघळ रस्त्यावर पसरले होते. तर रिक्षामधील प्रवाशांनाही गंभीर दुखापती झाल्या होत्या. परिणामी ठिकठिकाणी रक्ताचे डाग दिसत होते. मृत, जखमी यांच्या चपला व इतर साहित्य इतस्तत: पसरले होते. यात मृत अमित व परशुराम यांच्यासमवेत असलेल्या बाजारहाटातील भाजी वगैरे वस्तूंचाही समावेश होता.
दोन्ही वाहनांचे नुकसान
अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. यात रिक्षाची पुढील उजवी बाजू आतमध्ये चेपली होती. दर्शनी काचही निखळली होती. तर दुचाकीच्याही हँडल, पुढील चाकाचे नुकसान झाले होते. घटनास्थळी दोन्ही वाहनांचे काही पार्टही पडले होते.
पोलिसांकडून पंचनामा
अपघाताची माहिती समजताच कणकवली पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. उपनिरीक्षक जगदिश बांगर, अनमोल रावराणे, जयश्री पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक बापू खरात आदींसह पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर दोन्ही मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले.
घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी
अपघाताची माहिती समजल्यानंतर जि. प. माजी अध्यक्ष गोटय़ा सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत, राजू पेडणेकर, हरकुळ बुद्रुक पोलीस पाटील संतोष तांबे, ऍड. प्रकाश पावसकर, वामन गोसावी, अनिल खोचरे, तौसीफ पटेल, हरकुळ बुद्रुक-सुतारवाडी येथील रवींद्र मेस्त्राr, अतुल मेस्त्राr, प्रदीप मेस्त्राr, प्रवीण मेस्त्राr, दीपक मेस्त्राr, लक्ष्मण मेस्त्राr आदी घटनास्थळी दाखल झाले होते.
सुतारवाडीवर शोककळा
अपघातातील मृत परशुराम पांचाळ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन भाऊ असा परिवार आहे. अमित मेस्त्राr यांच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. अपघाताची फिर्याद रिक्षाचालक गणेश घाडी यांनी कणकवली पोलिसांत दिली. दुचाकीचालकाने चुकीच्या बाजूला येत रिक्षाला धडक दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सायंकाळी उशिरा सुरू होती.
सकाळीच मुंबईहून आले, दुपारी मृत्यू
अपघातात ठार झालेले परशुराम पांचाळ हे मुंबईत एका बँकेत कामाला आहेत. शुक्रवार, 27 नोव्हेंबरला सकाळीच ते मुंबईहून हरकुळ येथे गावी आले होते. तर अमित मेस्त्राr हे हरकुळ येथे त्यांच्या घराजवळच राहतात. अमित हे कामानिमित्त कनेडी येथे जात होते. यावेळी त्यांच्यासोबत मुंबईहून आलेले परशुराम होते. तेथून काम आटोपून परतत असतानाच त्यांना मृत्यूने गाठले.