मुंबई
चिनी स्मार्टफोन कंपनी रियलमीने आपला नवा बजेट स्मार्टफोन सी 11 बाजारात उतरवला आहे. बजेटमध्ये फोन घेऊ इच्छिणाऱया ग्राहकांची या फोनमुळे इच्छा पूर्ण होणार आहे. सी 11 या स्मार्टफोनची किंमत 7 हजार 499 रुपये इतकी असणार असल्याचे समजते. 5 हजार एमएएच बॅटरीसोबत मीडियाटेक हेलियो जी 35 प्रोसेसरसह हा फोन दाखल झालाय. तर 6.5 इंची एचडी प्लस मिनी-ड्रॉप फुलस्क्रीन डिस्प्ले या सुविधा यात असतील. रियलमीच्या सी सिरीजमधील फोन्स घेणाऱया ग्राहकांची संख्या 130 लाख इतकी आहे. सी 11 हा स्मार्टफोनही ग्राहकांना पसंत पडेल अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे. हा फोन 22 जुलैपासून रियलमी डॉट कॉम, फ्लीपकार्ट डॉटकॉम आणि निवडक स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या फोनमध्ये 13 एमपी एआय डय़ुअल कॅमेरा आहे. 32 जीबी इंटरनल स्टोरेजसह 2 जीबी रॅमसह येणारा हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारीत असणार आहे.