नवी दिल्ली : स्मार्टफोन्सच्या क्षेत्रात कार्यरत असणारी रियलमी ही चिनी कंपनी मेक इन इंडिया अंतर्गत भारतातच आपला कारखाना सुरू करणार आहे. ग्रेटर नोएडा याठिकाणी 100 टक्के क्षमतेने स्मार्ट टीव्हींचे उत्पादन घेण्यास कंपनीने सुरुवात केली आहे. सरफेस माउंट टेक्नॉलॉजीवर आधारित स्मार्ट टीव्हींचे उत्पादन घेतले जाणार आहे. या उत्पादन प्रक्रियेसाठी 300 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचे सांगण्यात येत आहे. स्मार्ट टीव्हींचे उत्पादन पूर्णपणे भारतातच करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. गेल्या काही महिन्यात रियलमीच्या स्मार्ट टीव्हींना मागणी वाढली असून ती पूर्ण करण्यासाठी या क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करून उत्पादनावर जोर देण्याचा कंपनीने निर्धार केला आहे. रियलमीच्या 32 इंची स्मार्ट टीव्हीची किंमत 13 हजार रुपयापर्यंत असून 43 इंची टीव्हीची किंमत 22 हजार रुपयापर्यंत आहे. लवकरच कंपनी 55 इंची टीव्ही आणणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
वायकॉम 18-सोनी विलिनीकरण ऑगस्टमध्ये
मुंबई : वायकॉम 18 आणि सोनी यांच्यातील विलिनीकरणाची प्रक्रिया ऑगस्टच्या मध्यावर पूर्ण होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. सोनी पिक्चर्स नेटवर्क्स आणि वाय कॉम 18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे विलिनीकरण होण्याचे निश्चित झाले असून या संदर्भातली कार्यवाही ऑगस्टच्या मध्यावर पूर्ण होण्याची शक्मयता सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. एकदा विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली की 2021 च्या शेवटी एकत्रित कामकाजाला सुरूवात केली जाणार असल्याचे समजते. सोनीने वायकॉम 18 मध्ये 74 टक्के इतका वाटा खरेदी केला असून अजूनही 26 टक्के वाटा घेतल्यानंतर विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. दोन्ही कंपन्यांचा करार पूर्ण झाल्यानंतर खऱया अर्थाने मनोरंजन क्षेत्रात सोनीला यानंतर अधिक गतीने पुढे जाता येणार आहे.
स्पाइस जेटला 800 कोटींचा तोटा
मुंबई : हवाई क्षेत्रात कार्यरत असणाऱया स्पाइसजेट कंपनीला चौथ्या तिमाहीत 800 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. या तुलनेमध्ये मागच्या वषी याच कालावधीत कंपनीला 56 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवसायांना संकटाचा सामना करावा लागतो आहे. कोरोनामुळे विमानसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. हवाई क्षेत्रातील विमानसेवा पूर्णपणे सुरू न झाल्याने कंपनीची आर्थिक गणिते कोलमडली आहेत. कंपनीला आर्थिक वर्ष 2020 मध्ये 934 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे सांगण्यात येत आहे.