रिलायन्सचे बाजारमूल्य सप्टेंबरमध्ये 16 लाख कोटीपेक्षा अधिक – टाटा समूह अग्रस्थानी
वृत्तसंस्था/ मुंबई
मुकेश अंबांनीच्या नेतृत्वात कार्यरत असणाऱया रिलायन्स समूहाचे बाजारमूल्य तिसऱया स्थानी पोहोचले आहे. सप्टेंबरमध्ये कंपनी प्रथम क्रमांकावर होती. सध्या रिलायन्स आणि पहिल्या नंबरवर असणाऱया टाटा समूहाच्या बाजारमूल्यात 4.57 लाख कोटी रुपयांचा फरक आहे. रिलायन्स समूहाच्या लिस्टेड कंपनीचे बाजारमूल्य 12 लाख 68 हजार 478 कोटी रुपये आहे. टाटा समूहाचे बाजारमूल्य हे 17 लाख 25 हजार 567 कोटी रुपये झाले आहे.
रिलायन्सची कामगिरी पाहता रिलायन्स समूहाचे बाजारमूल्य 14 सप्टेंबर रोजी 16 लाख कोटीपेक्षा अधिक होते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य 15.40 लाख कोटी होते. सध्याच्या घडीला हे मूल्य 12.5 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. सप्टेंबरमध्ये रिलायन्स पीपीचे (पार्शली पेड समभाग) बाजारमूल्य 60 हजार कोटी रुपये राहिले होते जे सध्याला 43 हजार कोटी रुपये राहिले आहे. बायबॅकनंतर समभाग लिस्ट करण्यात आले आहेत.
एचडीएफसीने रिलायन्सला टाकले मागे
दुसऱया स्थानी एचडीएफसी समूह आहे. यामध्ये 8 लाख कोटी रुपयासोबत एचडीएफसी बँक सर्वात मोठा समूह ठरला आहे.
यामध्ये दुसऱया स्थानी एचडीएफसी लिमिटेड आहे. यांचे बाजारमूल्य 4.96 लाख कोटी रुपये आहे. यांच्या अन्य कंपन्यांमध्ये एचडीएफसी लाईफ असून याचे बाजारमूल्य 1.46 लाख कोटी रुपये आहे. एचडीएफसी असेट मॅनेजमेंट कंपनीचे बाजारमूल्य 68 हजार कोटी रुपयांवर आहे.