कोल्हापूर/प्रतिनिधी
रुईकर कॉलनी जवळ एसटी बसला मागून येऊन एका मोपेड वाहनाने जोराची धडक दिली. आज सकाळी आठच्या दरम्यान ही घटना घडली. या अपघातात जाधववाडीतील तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला सीपीआर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, या अपघातात मोपेड चा चक्काचूर झाला आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,चंदगड आगारातून सुटलेली बस आज सकाळी कोल्हापूरकडे येत होती. रुईकर कॉलनी येथे आले असता मारुती मंदिर स्टॉप ला प्रवासी उतरत असताना मागून येणाऱ्या मोपेड वाहनाने या बसला जोराची धडक दिली. या अपघातात मोपेड चा चक्काचूर झाला आहे. या घटनेत जाधववाडीतील नईम भोसकर हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे.