बेंगळूर /प्रतिनिधी
कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी शेजारच्या राज्यात म्हणजेच महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली.
मंत्री सुधाकर यांनी ट्विटमध्येम्हणाले की, शेजारच्या राज्यात कोरोनो विषाणूच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. तसेच राज्यात ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण सुरु असून त्यांनी कोरोना ही लस घ्यावी असे आव्हान केले. तसेच त्यांनी मंत्र्यांनी ट्विटमध्ये कोविड -१९च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यावर भर दिला.
मागील २४ तासांत महाराष्ट्रात १३ हजाराहून हून अधिक नवीन संक्रमण आढळले आहेत. ही परिस्थिती चिंताजनक आहे. लोकांना गर्दीपासून दूर रहावे असे आवाहन करीत सुधाकर यांनी मुखवटा घालून सामाजिक अंतर राखण्याचा आग्रह धरला. सार्वजनिक स्थळे व सणांच्या निमित्ताने अधिकाधिक जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. मंत्र्यांनी ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लवकरात लवकर लस घेण्याचे आवाहन केले. जवळपासच्या ज्येष्ठ व्यक्तींनीही यासाठी प्रेरित केले पाहिजे, असे ते म्हणाले.