वृत्तसंस्था/ दुबई
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या दुबई खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत रुमानियाच्या माजी टॉपसीडेड तसेच या स्पर्धेत यापूर्वी दोनवेळा विजेतेपद मिळविणाऱया सिमोना हॅलेपने एकेरीची उपांत्यफेरी गाठताना टय़ुनेशियाच्या जेबॉरचा पराभव केला.
गुरुवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हॅलेपने जेबॉरचा 6-4, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. आता हॅलेप आणि ओस्टापेंको यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल. हॅलेपला विजयासाठी तब्बल दीड तास झगडावे लागले. ओस्टापेंकोने झेकच्या क्विटोव्हाचा पराभव करत सलग दुसऱयांदा या स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. झेक प्रजासत्ताकच्या व्होन्ड्रोसोव्हाने युपेनच्या यास्ट्रेमेस्कावर 7-5, 6-4 अशी मात करत उपांत्य फेरी गाठली आहे.