ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पश्चिम रेल्वेने डबल-स्टेक कंटेनर यशस्वीरित्या चालवून जागतिक विक्रम नोंदविला आहे. आतापर्यंत जगातील सर्वात मोठ्या विकसित देशांनाही हे यश प्राप्त झालेले नाही. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.
पश्चिम रेल्वेने हाय राईज ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई) पासून इलेक्ट्रीफाईड स्टेशन दरम्यान मध्यवर्ती डबल-स्टेक कंटेनर ट्रेन यशस्वीपणे चालवून रेल्वेेेने नवीन वर्ल्ड बेंचमार्क स्थापित केला आहे.
डबल-स्टेक कंटेनर ट्रेनचे अनेक फायदे आहेत. हा कंटेनर केवळ पर्यावरणास अनुकूल नाही, तर ऑपरेट करणे देखील अधिक किफायतशीर आहे आणि दुप्पटपेक्षा अधिक वेळ वाचवू शकते. हे कंटेनर इलेक्ट्रिक लाइनद्वारे चालविले जाते, ज्याची उंची मर्यादित आहे.