बांदा/ प्रतिनिधी-
मडूरे – केरकरवाडी येथे कोकण रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत शिंगाडा (सांबर) ठार झाला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याचा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला. याबाबतची माहिती सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांना देण्यात आली आहे. याबाबतची माहिती मडुरा तंटामुक्त समिती अध्यक्ष बाळू गावडे यांनी दिली.