थायलंडमध्ये आहे हा अनोखा रेल्वेमार्ग
सोशल मीडियावर सध्या एक चित्रफित चर्चेचा विषय ठरली असून यात एक रेल्वे भाज्यांच्या बाजारपेठेच्या मधून निघताना दिसून येते. ही रेल्वे अत्यंत चिंचोळय़ा मार्गातून जात असून त्याच्या अवती भोवती भाज्यांची बाजारपेठ असून लोक स्वतःच्या दुकानांचे छत रेल्वे येताच हटविताना यात दिसून येते.
येथे रेल्वे येताच दुकानदार स्वतःच्या भाज्यांना रेल्वेमार्गावरून बाजूला करतात. हा रेल्वेमार्ग अत्यंत अरुंद असल्याने तो पाहून प्रत्येकजण दंग होतो. या व्हिडिओला इन्स्टाग्रामवर 13 कोटींहून अधिक ह्यूज मिळाले आहेत.
हा रेल्वेमार्ग अत्यंत प्रसिद्ध असून तो थायलंडच्या बँकॉक शहरात आहे. येथे एक रेल्वेमार्ग बाजारपेठेतून जातो. हा रेल्वेमार्ग पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात आणि याचा अनुभव घेतात. थायलंडच्या सॅमुट सॉन्गख्रम प्रांतात माइकलॉँग रेल्वेस्थानक आहे. स्थानकानजीक रेल्वेमार्ग शहराच्या मधून जातो.
फोल्डिंग अम्ब्रेला मार्केट
या रेल्वेमार्गावरच येथील सर्वात मोठा भाज्यांचा बाजार भरत असतो. या बाजाराचे नाव फोल्डिंग अम्ब्रेला मार्केट आहे. याचे नाव असे का असा विचार नक्कीच मनात आला असेल. या अरुंद मार्गावरून जाणाऱया रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूला भाज्यांची दुकाने थाटली जातात. रेल्वे येथून जात असताना दुकानदार स्वतःच्या दुकानाचे पडदे फोल्ड करून हटवितात, जेणेकरून रेल्वे सहजपणे निघून जाईल. येथे ग्राहक भाज्या खरेदी करण्यासाठी येतात, परंतु त्याहून अधिक पर्यटक ही जागा पाहण्यासाठी येत असतात.