अग्निशमनच्या प्रयत्नामुळे मोठा अनर्थ टळला
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव रेल्वे स्थानकावरील एमसीओ कार्यालयाला मंगळवारी पहाटे 6 च्या सुमारास आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. रेल्वे विभागाने अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर अग्निशमन जवानांनी ही आग आटोक्मयात आणली. परंतु यामध्ये कार्यालयातील अंदाजे अडीच लाख रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले.
रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद असल्याने रेल्वेस्थानक परिसरात शुकशुकाट आहे. मंगळवारी पहाटे रेल्वे स्थानकावरील एमसीओ कार्यालयाला अचानक आग लागली. संगणक तसेच इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य असल्याने आगीचा भडका उडाला. याची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमनच्या जवानांनी काही मिनिटांमध्येच ही आग आटोक्मयामध्ये आणली. आग आटोक्मयात आली नसती तर ती रेल्वे स्थानकाच्या इतर कार्यालयांमध्ये पसरण्याचा धोका होता.