नरेंद्र कुलकर्णी स्मृती टी-20 क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
नारीशक्ती व सिग्नेचर स्पोर्ट्स क्लब आयोजित नरेंद्र कुलकर्णी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात रॉजर क्रिकेट क्लबने एक्स्ट्रीम स्पोर्ट्स क्लबचा तर हिंडाल्को संघाने चॅलेंजर्स क्लबचा पराभव केला. पार्थ पाटील (रॉजर), सुनील गुरव (हिंडाल्को) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
जिमखाना मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात एक्स्ट्रीम स्पोर्ट्स क्लबने 20 षटकात 8 बाद 128 धावा केल्या. त्यात गुरूप्रसाद पोतदारने 3 षटकार, 5 चौकारासह 69 तर विशाल गौरगोंडाने 3 चौकारासह 13 धावा केल्या. रॉजरतर्फे पार्थ पाटील व अनिल नाईक यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल रॉजर संघाने 17 षटकात 5 बाद 129 धावा केल्या. पार्थ पाटीलने 1 षटकार, 4 चौकारासह 35 तर वैभव पाटीलने 26 धावा केल्या. एक्स्ट्रीमतर्फे सागर गौरगोंडाने 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात हिंडाल्को संघाने 20 षटकात 7 बाद 185 धावा केल्या. त्यात सुनील गुरवने 3 षटकार, 8 चौकारासह नाबाद 71 तर भरत गाडेकरने 1 षटकार, 2 चौकारासह 24 धावा केल्या. चॅलेंजर्सतर्फे दर्शनने 37 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल चॅलेंजर्स संघाचा डाव 14.5 षटकात 65 धावात आटोपला. त्यात नियाज सय्यद व राजु खरोसी यांनी प्रत्येकी 10 धावा काढल्या.
गुरूवारचे सामने –
स्कायटच आनंद अकादमी वि. गोकाक ग्लॅडिएटर्स, सकाळी 8.30 वा., 2) ऍडव्होकेट इलेव्हन वि. एमसीसीसी, दु. 12.30 वा.