बेळगाव :
रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाऊनचा अधिकारग्रहण समारंभ नुकताच पार पडला. माजी प्रांतपाल आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष अशोक कोळी व सचिव नागेश मोरे तसेच खजिनदार शिवानंद पडण्णावर यांना व त्यांच्या कार्यकारिणीला अधिकार देण्यात आले.
मावळते अध्यक्ष अशोक मळगली यांनी 2019-20 या कार्यकाळात केलेल्या कामाची माहिती दिली व सर्वांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. किरण लुगाडे यांनी अहवाल सादर केला. नूतन अध्यक्ष अशोक कोळी यांनी नवीन वर्षातील उद्दिष्टांचे वाचन केले. आनंद कुलकर्णी यांनी सदस्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी श्रीमंत धनगर, किरण लुगाडे, टी. आर. गणपती यांनी डोळय़ांची शस्त्रक्रिया करण्यासाठी गरजूंना आर्थिक मदत केली. अशोक बदामी यांना बेस्ट रोटेरियन पुरस्कार देण्यात आला.
याप्रसंगी डॉ. मनोज सुतार, वीरधवल उपाध्ये तसेच रोटेरियन सतीश नाईक, सतीश मिठारे, गुलाब चौगुले, अरुणकुमार पाटील, मनोहर जरतारकर, अनिल मुतगेकर, नारायण जाधव, रामचंद्र सांगले व रोटरी सदस्य उपस्थित होते. गुलाब चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. मनोहर जरतारकर यांनी आभार मानले.