व्यंकटेश देशपांडे यांची प्रांतपालपदी निवड
प्रतिनिधी/ बेळगाव
रोटरी परिवार ऑफ बेळगाववतीने नूतन प्रांतपालांचा अधिकारग्रहण समारंभ रविवार दि. 3 रोजी होणार आहे. दुपारी 3 वा. संतिबस्तवाड येथील व्हीटीयूच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. व्यंकटेश (बबन) देशपांडे यांची 2022-23 या वर्षाकरिता प्रांतपाल म्हणून निवड करण्यात आली आहे. रोटरीचे पीडीजी रवी धोत्रे यांच्या हस्ते अधिकार बहाल केले जाणार आहेत.
व्यंकटेश (बबन) देशपांडे यांचा अल्पपरिचय
व्यंकटेश देशपांडे यांनी बीएस्सी, डिप्लोमा इन फार्मसी पदवी घेतल्यानंतर किरकोळ आणि घाऊक औषधांचा उद्योग सुरू केला. नंतर बॉटलिंग उद्योगासाठी पीपी कॅप्स बनविणे, टेलिकॉम क्षेत्रासाठी केमिकल्स पुरविण्याचे काम सुरू केले. नाटकातील आवडींमुळे पुणे येथील भरतनाटय़ मंदिर येथे जाऊन नाटकातील तांत्रिक गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला. त्यांनी 15 हून अधिक नाटके, एकांकिका, मुलांची नाटके लिहिली. त्यांना त्यांच्या कामासाठी राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. पुढे त्यांनी बांधकाम क्षेत्रात पदार्पण करून घवघवीत यश मिळविले.
1990 साली रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथचे सदस्य झाले. त्यांनी क्लबसाठी उत्तम काम केले आहे. बेस्ट रोटेरियन पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना बेस्ट प्रेसिडेंट पुरस्कार, 6 डिस्ट्रिक्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. व्यंकटेश यांच्या पत्नी डॉ. संध्या देशपांडे या मराठीच्या प्राध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत.
रवी धोत्रे यांचा अल्पपरिचय
रवी धोत्रे यांचे शालेय शिक्षण पुण्यातील मराठी विद्यालय येथे झाले. टाटा, बिर्ला या उद्योजकांसोबत काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी 1981 साली विश्वेश्वरय्या ग्रुप ऑफ कंपनीज हा उद्योग सुरू केला. 1990 साली रोटरी क्लब ऑफ पुणे कर्वे नगर येथून त्यांनी रोटरीच्या कामाला सुरुवात केली. टाटांच्या सीएसआर योजनेंतर्गत रोटरीसाठी त्यांनी 10 कोटी रुपये उभे केले. 2022-23 सालासाठी त्यांना रोटरी इन्स्टिटय़ूटचे सेपेटरी म्हणून नेमण्यात आले आहे.