अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचे आवाहन : दिवाडीत महिला संमेलन मेळावा उत्साहात
प्रतिनिधी / कुंभारजुवे
रोहन हरमलकर हे देव माणूस आहेत. अत्यंत चांगला सज्जन माणूस. सज्जन माणसांना सांगावे लागत नाही त्यांच्या देहबोलीतून कळते. एखाद्याची नजर घाणेरडी असेल तर बाईला बरोबर कळते बघा. समोरून येणारा माणूस धक्का मारणार की नाही हे बघितल्यावर कळते. तसे माणूस सज्जन आहे हे रोहनच्या डोळय़ात कळले. रोहन हरमलकर हे दानशूर व्यक्तिमत्त्व सर्वांच्या हाकेला पावणारे असे बोलणाऱयांच्या तोंडून कळून चुकले. तेव्हाच शिक्कामोर्तब झाले की रोहन देवमाणूस. त्यांनी सर्वांना केलेली मदत सर्वांच्या वेळेकाळेला धावणारा अशा देवमाणसाला एकटय़ाला सोडू नका. तुम्ही सर्वजण रोहनच्या पाठिशी रहा त्यातच देव तुमचे बरे करेल. येणाऱया काळासाठी कुंभारजुवा मतदारसंघात रोहनची अत्यंत आवश्यकता असून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी त्यांना पाठिंबा द्या. असे आवाहन प्रसिद्ध सिने अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी मालार दिवार बेटावर बोलताना केले.
भाजपा कार्यकर्ता तथा कुंभारजुवा मतदारसंघाचे समाजसेवक रोहन रंगनाथ हरमलकर व साव माथीयस मालार गोलतीम नावेलीम पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने महिला संमेलन मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी श्रीमती नाडकर्णी प्रमुख अतिथी या नात्याने बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर दिवारची कन्या तथा समाजसेविका कुंदा चोडणकर, रोहन हमरलकर, शारदा हमरलकर, गोलती नावेलीच्या सरपंच स्नेहल संतोष हमरलकर, उपसरपंच विशाखा बांदोडकर, महिला मोर्चा अध्यक्षा कुंभारजुवा अन्नपूर्णा शिरोडकर, डेनवर गावकर, समीर वळवईकर, सांत माथायस सरपंच मोहन वळवईकर, गोलती नावेलीचे सरपंच मारिओ पिंटो, माजी जिल्हा पंचायत सदस्य महिमा देसाई, चंदन वरगांवकर, तुळशीदास कुंडईकर, सामिल वळवईकर आदी उपस्थित होते.
मुला मुलींमध्ये भेदभाव नको- कुंदा चोडणकर
रोहन हरमलकर यांनी वेगवेगळय़ा क्षेत्रात कार्य बजावलेल्या 50 हून अधिक महिलांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. हा उपक्रम करून त्यांना सर्वांचा आशीर्वाद मिळणार आहे. हा महिला दिन 8 मार्च न राहता 365 दिवसही हा मान राहिला पाहिजे. पूर्वी महिलांना अर्धा पगार देण्यात येत होता. अशा अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी अमेरीकेने मोठे जन आंदोलन केले तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो. आम्ही महिलांनी एकमेकांना आधार दिला पाहिजे. महिला बाहेर निघाल्यावर आम्हीच महिलांना नाव ठेवतो. जर कुणी महिला पुढे सरतात तर त्यांना हात देऊन पुढे नेऊया. मुला मुलींमध्ये भेदभाव करू नका. मुलापेक्षा मुलींना अभ्यासात पुढे पाठवा कारण सर्वचजण रोहन हरमलकर सारखे नसतात. मुलींना शिक्षण दिले तर ते वाया जाणार नाही. रोहन हरमलकर या कार्यक्रमामुळे अभिनंदनास पात्र आहेत. सर्वांचा आशीर्वाद रोहनच्या पाठिवर आहे. त्यांनी पुढे सरून आपले कार्य सुरूच ठेवावे असे समाजसेविका कुंदा चोडणकर म्हणाल्या.
यावेळी गावातील 50 हून अधिक नागरिकांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. दिवाडी गावचे सुपुत्र रोहन हरमलकर आमच्यासाठी छान आहेत. त्यांनी या गावासाठी आणि नागरिकांसाठी केलेले कार्य अविस्मरणीय असून कुंभारजुवा मतदारसंघासाठी त्यांची त्यांची आवश्यकता असल्याने सर्वांनी त्यांना हात देऊन पुढे न्यावे अशी मागणी यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये तर आभार शिल्पा वाटेकर यांनी मानले. कार्यक्रमास महिलावर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता.