वृत्तसंस्था/ कोलंबो
लंकेचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक कुसल परेरा याला दुखापत झाल्याने तो भारताविरुद्ध होणाऱया आगामी मालिकेमध्ये खेळू शकणार नाही, अशी माहिती लंकन क्रिकेट मंडळाने शुक्रवारी दिली आहे. धवनच्या नेतृत्वाखाली भारताचा दुसरा संघ लंकेबरोबर तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे.
18 जुलैपासून भारत आणि लंका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेसाठी कुसल परेरा आणि बिनुरा फर्नांडो दुखापतीमुळे उपलब्ध होऊ शकणार नाहीत. परेराच्या उजव्या खांद्याचा स्नायू दुखावल्याने त्याला या मालिकेत खेळता येणार नाही तर फर्नांडोच्या डाव्या पायाच्या घोटय़ाला सरावावेळी दुखापत झाली होती.