प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये लंडनहून आलेल्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पुण्यात पाठवण्यात आले आहेत़ नव्याने विकसित झालेल्या कोरोनाची लागण झाली आहे का, हे पुण्यात पाठवलेल्या अहवालावरून स्पष्ट होणार आह़े दरम्यान शनिवारी आणखी सात जण लंडनहून जिह्यामध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली आह़े
शनिवारी सात नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तर 13 बरे झालेल्यांना जिल्हा रुग्णालयातून उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े जिह्यातील एकूण कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 9 हजार 155पर्यंत पोहोचली आहे. शनिवारी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून करण्यात आलेल्या 126 कोरोना चाचण्यांपैकी आरटीपीसीआर टेस्टमध्ये 4 तर ऍन्टिजेन टेस्टमध्ये 3 बाधित रुग्ण आढळून आले आहेत़ यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 3, दापोली 1, चिपळूण 2, लांजा 1 असे रूग्ण मिळून आले आहेत़ एकूण बरे झालेल्यांची संख्या 8 हजार 646 वर पोहोचली आह़े जिह्यातील बरे होण्याचे प्रमाण 94.44 इतके आह़े
बेनीखुर्द, आसगे शाळा बंद
लांजा तालुक्यातील बेनीखुर्द गावामध्ये 55 वर्षीय महिला पॉझिटिव्ह सापडताच गावातील व शेजारील गावातील शाळा बंद ठेवण्यात आली. बेनीखुर्द येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर 1 ही शनिवारपासून बंद ठेवण्यात आली. तर बेनीखुर्द येथील विद्यार्थी आसगे येथे हायस्कूलला जातात, मात्र बेनीखुर्द येथे महिला पॉझिटिव्ह सापडल्याने हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना लवकर घरी सोडण्यात आले. तर आसगे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 ही बंद ठेवण्यात आली.